Tuesday , December 16 2025
Breaking News

खानापूर

खानापूर भाजपमधील इच्छुकांसाठी होणार मतदान

  खानापूर : खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक धर्मनाथ भवन बेळगांव येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. खानापूर भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळे उमेदवार निवडीचे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांची मते अजमावण्याचे ठरविले आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या महाशक्ती प्रमुख, बूथ …

Read More »

खानापूर विद्यानगरात गटारी, सीडीचे काम उत्कृष्ट दर्जाचे, नागरिकांतून समाधान

  खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षापासून विद्यानगरात गटारीचे व रस्त्याची कामे झाली नाहीत. परंतु नुकताच खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील विद्यानगरात सर्वे नंबर ९२ मधील वसाहतीत नगरपंचायतीच्या वतीने या भागाचे नगरसेवक विद्यमान नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करून गटारी व सीडीचे विकास काम नुकताच करण्यात आले आहे. यापुढेही उर्वरित …

Read More »

विटांची लॉरी उलटून एकाचा मृत्यू; अन्य दोघे गंभीर जखमी

  खानापूर : देवट्टीहून परिश्वाडकडे विटा घेऊन जाणारी ट्रक उलटून एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. दावल साब फयाज मुनवळ्ळी यांचे निधन झाले. चालक मंजुनाथ चंद्रू कुकडोळी व मजूर मंजुनाथ गुरन्नावर हे जखमी झाले आहेत. चालकाचे लॉरीवरील नियंत्रण सुटल्याने लॉरी रस्त्याच्या कडेला उलटली. …

Read More »

खानापूर विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था कडक : निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रद

  खानापूर : कर्नाटक विधानसभा निवडणूकीची तारीख निवडणुक आयोगाने जाहीर केल्याने खानापूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक अधिकारी (Ro) अनुराधा वस्त्रद यांनी आज तहसीलदार कचेरीत पत्रकार परिषद घेऊन खानापूर विधानसभा क्षेत्रात केलेली पुर्व तयारी व निवडणुकीत राजकीय पक्षांना लागु असलेली आचारसंहिता याबद्दल माहिती दिली. यावेळी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड पोलीस ईन्सपेक्टर रामचंद्र …

Read More »

“ऑपरेशन मदत” अभियानांतर्गत गोल्याळी येथे विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य भेट

  बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गोल्याळी गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत खेळाचे साहित्य भेट स्वरूपात दिले. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा संपल्या आहेत. तेव्हां या छोट्या मुलां-मुलींना मैदानात खेळायची संधी मिळाली म्हणून ‘ऑपरेशन मदत’ संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या …

Read More »

खानापूर कंत्राटदारांच्या बैठकीची काँग्रेस पक्षाला भिती, खोटे आरोप केल्याची बतावणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेने नुकताच बैठक घेऊन तालुक्यात स्थानिक उमेदवारालाच येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणू. कारण गेल्या पाच वर्षाच्या काळात खानापूर सरकारी कंत्राटदाराना कोणतेच काम दिले नाही. त्यामुळे खानापूर सरकारी कंत्राटदारच्या सदस्यांना उपासमारीची वेळ आली. गेल्या ४० वर्षाच्या काळात अशी वेळ आली नव्हती. खानापूर सरकारी …

Read More »

अवैध हात भट्टीवर खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर (प्रतिनिधी) : येत्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात पोलिस खात्याकडून अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे खानापूर जांबोटी रोडवरील काजूच्या बागेत हात भट्टीवर दारू काढत असल्याची माहिती मिळताच खानापूर पोलिस स्थानकाचे सी पी आय रामचंद्र नायक यांनी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली छाप्यात टाकाला. छाप्यात …

Read More »

“या मागचा” बोलविता धनी वेगळाच!

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार मतदार संघात समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला जात असतानाच खानापूर तालुक्यात दूही माजविण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरु केला आहे. मात्र या मागचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. तसेच समिती विरोधात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांतून दिला …

Read More »

पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला चांगलेच धारेवर धरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीला ग्रामस्थांना रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदगड …

Read More »

जितो इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” पुरस्कार प्रमोद कोचेरी यांना प्रदान

  खानापूर : खानापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागातील रस्ते होण्यासाठी, दुर्गम भागातील गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क ठेवून त्यांच्या कानावर या गोष्टी घालून लोकांच्या समस्या मार्गी लावणारे व या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांना जितो इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” …

Read More »