खानापूर (प्रतिनिधी) : सध्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने खानापूर तालुक्यातील लोंढा गुंजी दरम्यान असणारे रेल्वे फाटक बुधवारी दि. ४ व गुरूवारी दि. ५ जानेवारी असे दोन दिवस बंद राहणार आहे. या रेल्वे फाटकावरून होणारी वाहतूक दोन दिवस बंद राहिल. यावेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक …
Read More »खानापूरात भाजपचा बुथ विजयी दिन अभियानाला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप बुथ विजय दिन अभियानाला सोमवारी खानापूर भाजप कार्यालयात प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. तर मार्गदर्शक म्हणून कर्नाटक राज्याचे रयत संघटना राज्याध्यक्ष इराणा कडाडी होते. व्यासपीठावर खानापूर तालुक्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या फोटोचे पुजन मान्यवराच्याहस्ते …
Read More »पत्रकार वासुदेव चौगुले यांना आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार
खानापूर : माचीगड (ता. खानापूर) येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या वतीने झालेल्या 26 व्या मराठी साहित्य संमेलनात पत्रकारितेसाठी दिला जाणारा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार दै. पुढारीचे पत्रकार वासुदेव चौगुले यांना देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी आमदार दिगंबर पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, अकादमीचे …
Read More »खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक संपन्न
खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील हत्तरवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. २०२३ चा कुस्ती आखाडा भरविण्यासाठी पुढील बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष माजी जि. पं. सदस्य लक्ष्मण बामणे, खजिनदार तानाजी कदम, माजी अध्यक्ष …
Read More »विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेची बैठक संपन्न
खानापूर : विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेची बैठक रविवार दि. 01/01/ 2023 रोजी जटगे येथे संपन्न. सभेची सुरुवात श्री गणेश नमन व नव वर्षाच्या शुभेच्छेने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गावचे ग्रा. पं. सदस्य सागर पाटील यांनी शाब्दिक रूपात केले. संघटनेचे लोंढा भाग प्रमुख श्रीकृष्ण खांडेकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या परिचयासह …
Read More »कळसा- भांडुरा प्रकल्पासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात येणार
खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : कळसा- भांडुरा प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर म. ए. समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला कळसा- भांडुरा प्रकल्पाचे गाढे अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर हे उपस्थित होते. प्रा. केरकर यांनी म्हादई प्रकल्पाची माहिती समिती …
Read More »कर्नाटक सरकार कौरवांचा वारसा चालवत आहेत का?
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस खानापूर : अन्यायाने कर्नाटकात डांबलेला सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट होत नाही तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अधुरेच राहील. महाभारतात कौरवांनी पांडवांना एक इंचही जमीन न देण्याची भाषा केली होती. आता कर्नाटक देखील तीच भाषा वापरतो. कर्नाटक सरकार कौरवांचा वारसा चालवत आहेत का? असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक …
Read More »शिवगर्जना महानाट्य खानापूर तालुक्यातील जनतेसाठी पर्वणीच
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप व तालुका भाजपच्या वतीने येत्या दि. ७ ते १० जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवगर्जना हा महानाट्य प्रयोग होणार आहे. यानिमित्ताने सोमवारी दि. २ जानेवारी रोजी सकाळी येथील …
Read More »क्रीडा व सांस्कृतिक उद्घघाटन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर : येथील मराठा मंडळ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. नागराजू यादव तसेच प्रमुख पाहूने म्हणून श्री. शिवाजी पाटील व श्री. परशुराम अण्णा गुरव उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या बीए प्रथम सत्रात शिकणाऱ्या कु. मल्लाप्पा करगुप्पी या मुष्ठीयुध्द खेळात विविध स्थरावर आपले …
Read More »नंदगड महात्मा गांधी संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!
नंदगड : येथील एनआरई संस्था संचलित महात्मा गांधी संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात नुकताच वार्षिक क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. 2022-23 सालाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. दोन दिवस या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. संस्थेचे चेअरमन श्री. सी. जी. वाली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. प्रारंभी संस्थेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta