Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी तालुक्यात दहावीच्या मराठी विभागातून प्रथम व व्दितीय

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच दहावीचा निकाल लागला असून खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थीनी कुमारी संजना नारायण घाडी हिने मराठी विभागातून 621 गुण (99.36) तालुक्यात प्रथम तर कु. अर्चना एन. पाटील हिने 608 गुण घेऊन व्दितीय आली आहे. कन्नड माध्यमची विद्यार्थीनी कु. प्रियांका पी. देवलतकर हिने 617 गुण …

Read More »

वादळी पावसाने निलावडे परिसरीतील शेतकऱ्याच्या वायंगण भात पिकाचे प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे, मुघवडे, कबनाळीसह अनेक भागात उन्हाळी पिक म्हणून वायंगण भात पिकाचे उत्पन्न शेतकरी घेतात. नुकताच झालेल्या वादळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला. याची पाहणी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …

Read More »

संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म : मंजुनाथ स्वामी

खानापूरात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने गुरूवंदना कार्यक्रम संपन्न खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने येथील पाटील गार्डन सभागृहात गुरूवारी गुरूवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की, संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म आहे. आज खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या एकीत खोडा घालणारे हे कोण?

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी मध्यंतरी ऐक्याचे वारे वाहू लागले होते. त्याचे समितीप्रेमी नागरिकांनी स्वागतही केले. पण हे ऐक्य अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. अशातच तालुका समितीच्या कार्यकारिणी निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या वेळच्या 2018 मधील …

Read More »

क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने उद्या खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम

बेळगाव : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे उद्या गुरुवार दि. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता अ. भा. क्षत्रिय मराठा समाजाचे धर्मगुरू प.पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाटील गार्डन करंबळ क्रास खानापूर येथे सदर गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमापूर्वी उद्या …

Read More »

गस्टोळी कॅनलचा पाणी पुरवठा त्वरीत करावा

भरमानी पाटील यांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्वात जुना गस्टोळी कॅनल तुटून गेल्याने सहा महिन्यापासुन गस्टोळी परिसरातील विजयनगर, गस्टोळी, गस्टोळी दट्टी, भुरूनकी, चिंचवाड, मास्केनट्टी, करकट्टी आदीसह अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला. याला वाचता फोडण्यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी गस्टोळी कॅनलची समस्या …

Read More »

सिंगीनकोप शाळेत शाळा प्रारंभोत्सव उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्वप्राथमिक मराठी शाळेत शाळा प्रारंभोत्सव सोमवारी दि. 16 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन गावातून प्रभात फेरी काढून शाळा प्रारंभोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, …

Read More »

उचवडे येथे महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

खानापूर : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बैलूर ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया बामणे होत्या. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करताना वाचनालय स्थापन करण्यामागचा उद्देश सांगितला. बैलूर कृषीपत्तीन बँकेचे माजी अध्यक्ष मंगेश गुरव व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बाबुराव पाटील …

Read More »

“भावांकुर” काव्यसंग्रहाचे गर्लगुंजीत थाटात प्रकाशन

खानापूर : गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गर्लगुंजी ग्रामस्थ, एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या …

Read More »

शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पुजारी रामू मिराशी होते. यावेळी रवळनाथ मंदिराचा कळसारोहण कुंभार्डा येथील हंडीभडगंनाथ मठाचे मठाधिश श्री पिरयोगी मोहननाथजी यांच्याहस्ते करण्यात आला. तर रवळनाथ मंदिराचा लोकार्पण श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजपनेते विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात …

Read More »