Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

हलशी ते गुंडपी रस्त्याची दयनीय अवस्था

  खानापूर : हलशी ते गुंडपी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती हलशी-गुंडपी रस्त्याची झाली आहे. संबंधित खात्याकडे वारंवार मागणी करून देखील या रस्त्याची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे. छत्रपती शिवाजी हायस्कूल हलशी ते सरकारी मराठी शाळा हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याची दुरावस्था …

Read More »

अबनाळी गावाला सीसी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि जंगल भागातील शिरोली ग्राम पंचायत हद्दीतील अबनाळी गावाला माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या फंडातून अबनाळी गावासाठी सीसी रोड साठी निधी मंजूर केला. त्या कामाचा शुभारंभ गुरूवारी दि. १३ रोजी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या शुभहस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी …

Read More »

काळ्या दिनाच्या जागृतीसाठी खानापूर तालुक्यातील गावोगावी संपर्क दौरे

  खानापूर (प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जाण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावातून गावोगावी दौरे काढून काळ्यादिनी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी लागलीच संपर्क दौऱ्याला प्रारंभ करू, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मारक सभागृहात बोलाविलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून …

Read More »

भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल : आबासाहेब दळवी

नागुर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम खानापूर : हल्ली गावागावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. पण भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल, याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. येत्या काळात भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म.ए. समिती नेते …

Read More »

गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर खड्डा बुजविण्यासाठी शेडूमिश्रीत माती, पीडब्लूडीचा निष्काळजीपणा

    खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या कणवीजवळील गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर भला मोठा खड्डा पडून महिना होत आला. मात्र खानापूर पीडब्लूडी खात्याने भर रस्त्यावरील खड्ड्यात ट्रॅक्टर भर शेडूमिश्रीत माती सोडून गेली आहे. खड्डा दुरूस्तीचे काम राहिले बाजुला या मातीच्या ढीगामुळे वाहतुकीला धोका झाला आहे. महिना ओलांडुन गेला तरी …

Read More »

हेम्माडगा- अनमोड रस्ता १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीस बंद

  खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजीपर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम असल्याने रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. …

Read More »

भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे येथे नेत्र तपासणी शिबीर

खानापूर : खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे ग्रामस्थांसाठी 12-10-2022 वर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कार्यकर्ता यावेळी व्यासपीठावर गणपत गावडे, अनंत गावडे, जयदेव चौगुले, सचिन पवार, लाडूताई (ग्रामपंचायत सदस्य), आनंद तुप्पद (नंदादीप हॉस्पिटल) यांच्यासह भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होते. डॉ. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गुरुवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सभा गुरूवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीत २१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जनजागृती मोहीमे संदर्भात तसेच १ नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी …

Read More »

नंदगड ग्रा. पं. मासिक सभेत पीडीओ गैरहजर, बैठक वादळी

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीची मासिक बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत ग्राम पंचायतीचे पीडीओ गैर हजर होते. यावेळी बैठकीत उपाध्यक्ष व सदस्यांनी ग्राम पंचायत पीडीओ आनंद भिंगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका असल्याने लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी बैठकीत ग्राम पंचायत सदस्यांनी मागणी केलेली माहिती जो पर्यंत …

Read More »

लैला शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) संचालित श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसाची मोळी पुजन व गव्हाणीत ऊस टाकून करण्यात आला. यावेळी गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, प पू रामदास महाराज विश्वात्मक गुरूदेव सिध्दाश्रम मठ तोपिनकट्टी, प पू चन्नबसव देवरू रूद्र स्वामी मठ …

Read More »