खानापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूरच्या मैदानामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली, 3000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भाजपा नेते, संस्थापक श्रीमहालक्ष्मी ग्रूप श्री. विठ्ठल सोमना हलगेकर होते. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा खानापूर …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात अली आहे. यावेळी भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा कारखाना आवारात उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात पाठिंबा दर्शविण्यासाठी आपले विचार व्यक्त …
Read More »जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खानापूर समर्थ शाळेच्या खेळाडूंची निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथे नुकताच झालेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. प्राथमिक विभागातून अनिकेत सावंत, अथर्व चौगुले, या खेळाडूंनी कुस्ती दोरी उड्या, बॅटमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. हायस्कूल विभागातून दत्तराज पाटील, श्रेया चौगुले, मलप्रभा नांदुरकर या खेळाडूंनी कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक तर यशवर्धन …
Read More »खानापूरात मॅरेथॉन स्पर्धकांसाठी अकॅडमी
देशभरातून विविध राज्यातील धावपटू खानापुरात दाखल जगदीश शिंदे यांची धडपड खानापूर : मॅरेथॉन क्रॉस कंट्री व इतर दीर्घ पल्ल्याच्या स्पर्धेतील धावपटूंना प्रशिक्षण देऊन आंतराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम स्पर्धक तयार करणे या एकमेव उद्देशाने खानापूर शहरात ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापन करण्यात आली असून आत्तापर्यंत हरियाणा, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, …
Read More »शांतिनिकेतन स्कूलतर्फे उद्या खानापुरात मॅरेथॉन स्पर्धा
खानापूर (विनायक कुंभार) : स्वातंत्र्योत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शांतिनिकेतन सीबीएससी पब्लिक स्कूलच्या वतीने शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी सकाळी 7 वा. शांतिनिकेतन स्कूलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुला-मुलींसाठी असलेली ही स्पर्धा तीन गटामध्ये होणार असून 14 वर्षाखालील स्पर्धकांसाठी 3 कि.मी. अंतर …
Read More »गणेबैल मारहाण प्रकरणातील एकाला ताब्यात; खानापूर पोलिसांची कारवाई
खानापूर : गणेबैल येथील राजाराम गुरव यांच्यावर काल सायंकाळी 7च्या सुमारास अज्ञातांनी मारहाण केली होती. तातडीने त्यांना शासकीय दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले. नंतर आमदार निंबाळकर यांनी रात्री स्वत: खानापूर पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीसांना सूचना केली. दुसऱ्या दिवशी या तक्रारीबद्दल त्यांनी पोलिसांना धारेवर धरत रात्री …
Read More »रामगुरवाडी रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करावे; अन्यथा रास्ता रोको
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी खानापूर महामार्गावरील रामगुरवाडी गावाला जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या चार महिन्यात रस्त्याची दुर्दशा झाली. येत्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर बेळगाव-पणजी महामार्गावर रास्ता रोको करू, असे निवेदन रामगुरवाडी गावच्या नागरिकांनी खानापूर जिल्हा पंचायत कार्यालय, तहसीलदार, तसेच पोलिस स्टेशनला दिले. निवेदनात …
Read More »नेरसा गवळीवाडा येथे झाडाला लटकवलेल्या पिशवीत आढळले नवजात अर्भक
खानापूर : एका नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून ती पिशवी झाडाला लटकवण्यात आल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील अशोक नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या नेरसा गवळीवाडा येथे उघडकीस आली आहे. आशा कार्यकर्त्या सत्यवती देसाई यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक ठेवल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला कळवले. 108 रुग्णवाहिका बोलावून अर्भकाला खानापूर …
Read More »करंबळ प्राथमिक मराठी शाळेचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या खेळाडूनी गुंजी येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील सांघीक खेळात मुलाच्या कब्बडी संघाने प्रथम क्रमांक, तर मुलाच्या व्हाॅलीबाल संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला. वैयक्तीक स्पर्धेत स्पर्धेत ज्ञानेश्वर गाडी याने २०० मीटर धावणे …
Read More »जांबोटीतील राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटीतील (ता. खानापूर) गावच्या राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर राजवाडा रस्त्याच्या सीसी रोडसाठी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या फंडातून या निधी मिळाला असुन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta