Monday , September 21 2026
Breaking News

ओलमणी मराठी शाळेच्या शिक्षिकाचा सेवानिवृत्ती सत्कार

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ. सुषमा अनंतराव कुलकर्णी या 40 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कृष्णा चिखलकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केईबी खात्याचे कर्मचारी शाहु साबळे, पांडुरंग डिचोलकर, उपाध्यक्ष मारूती पाटील, विनोद डिचोलकर, परशराम नवलकर, ज्योती कालमनकर, प्रणाली राऊत, पत्रकार हणमंत जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक पी. आर. गुरव यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी निवृत्त शिक्षिका सौ. सुषमा कुलकर्णी व पती अनंतराव कुलकर्णी या दाम्पत्याचा शाल, पुष्पहार, श्रीफळ, भेटवस्तू देऊन शाळा व एसडीएमसीच्यावतीने करण्यात आला. त्याचबरोबर शिक्षकाच्या वतीने तसेच गावच्या युवक मंडळाच्या वतीने, माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कार मुर्तीच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. तर सत्कार मुर्ती सौ. सुषमा कुलकर्णी यांनी सत्काराबदल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शाळेचे शिक्षक एस. टी. मेलगे, ए. पी. चव्हाण, एफ. आर. वारीक, डी. पी. देसाई, प्रेमानंद झुंजवाडकर, गौरी मजगावी, तसेच विद्यार्थी व गावचे नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार व्ही. पी. नावगेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *