Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

गर्लगुंजीत मराठी मुलांच्या कोसळलेल्या शाळा इमारतीची जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ८५ वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्गखोल्या नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाल्या. ही बातमी कळताच बेळगाव जिल्हा न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी, बीईओ लक्षणराव यकुंडी, खानापूर तालुका न्यायाधीश सूर्यनारायण, खानापूर तालुका वकिल संघटना अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, …

Read More »

खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस, कबनाळीत घराची भिंत कोसळून लाखाचे नुकसान

खानापूर : खानापूर तालुका हा अति पाऊसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच अति जंगलाने वेढलेला तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासुन धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गावात जुन्या व मातीच्या घराची भिंत कोसळून राजू महाजिक या गरीब शेतकऱ्यांचे लाखोचे …

Read More »

खानापूर तालुक्यात घराची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू

  खानापुर : गेल्या आठवडाभरापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खानापुर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चुंचवाड गावातील अनंतू धर्मेंद्र पाशेट्टी (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे. घराशेजारील घरात तो गायी बांधत असे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गोठ्यात गायी चारण्यासाठी …

Read More »

हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती मंदिर पाण्याखाली

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूती मंदिर गेल्या आठवड्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याचा साठा वाढल्याने मंदिर पाण्याखाली गेले आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात असलेल्या स्वयंभू मारूती मंदिराच्या स्लॅब बुडला आहे. नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत …

Read More »

खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस; हलात्री पुलावर पोलिसांचा बंदोबस्त

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात येणार्‍या खानापूर-हेमाडगा गोवा महामार्गावरील हलात्री नदीच्या पुलावर गुरूवारी सकाळपासून पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी खबरदारी म्हणून खानापूर-हेमाडगा गोवा रोडवरील हलात्री नदीच्या पुलावरील वाहतुक बॅरिकेट लावून थांबविली आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव, दुथडी भरून वाहत आहेत. गुरूवारी …

Read More »

मुसळधार पावसाने रामगुरवाडीचा रस्ता झाला निकृष्ट दर्जाचा

  खानापूर (प्रतिनिधी) : रामगुरवाडी (ता. खानापूर) गावापासून ते खानापूर जांबोटी, महामार्गा पर्यंतच्या दोन किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण वाहून गेले आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणात चक्क शेडू दिसून येत आहे. …

Read More »

कस्तुरीरंगन अहवालाने तालुक्यातील 62 गावावर येणार निर्बंध

  कस्तुरीरंगन अहवालाला विरोध करणार : प्रमोद कोचेरी खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील जवळपास 62 गावाचा कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. याला विरोध करत येत्या 60 दिवसात तालुक्यातील 62 गावाचा संपर्क घेऊन, नागरिकांशी चर्चा करून नागरिकांसह खानापूर तालुका भाजपच्यावतीने केंद्र सरकारला हरकती देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार …

Read More »

वडिलांच्या वाढदिवसादिवशी मुलाची आत्महत्या

  खानापूर : वडिलांच्या वाढदिवसा दिवशीच मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथे घडली. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथील आंबेडकर गल्लीतील प्रथमेश राजू कोळी (17) याने आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईलची मागणी केली. पण वडिलांनी नवीन मोबाईल लवकरच घेऊ सध्या जुना …

Read More »

कालमणी व्हाया आमटे बससेवा सुरू होणार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिजंगल भागातील आमटे गावातून बससेवेने या भागातील जवळपास 80 ते 90 विद्यार्थी शाळा, कॉलेज शिक्षणासाठी खानापूरला नियमित ये-जा करतात. मात्र अलीकडे बससेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना खासगी ट्रॅक्स, टॅपो, दुचाकीवरून खानापूरला ये-जा करावे लागते. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्या कॉलेजच्या मुलीना प्रवास करणे धोक्याचे झाले …

Read More »

डॉ. अंजलीताई फाऊंडेशनतर्फे स्कूल बॅग वाटप

खानापूर : खानापूर येथील सरकारी शाळेतून डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या माध्यमातून स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी स्वत: आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर, खानापूरचे तहसीलदार, पट्टन पंचायतीचे अध्यक्ष मजहर खानापूरी तसेच सर्व नगरसेवक, एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच ब्लॉक काँग्रेसचे महादेव कोळी, मधू कवळेकर, महिला अध्यक्षा, महिला ब्रिगेड आदी उपस्थित …

Read More »