Monday , September 21 2026
Breaking News

काटगाळी प्राथमिक शाळेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love

 

खानापूर : शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय केंद्र पातळीवरील प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धेत काटगाळी (ता. खानापूर) शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. हत्तरगुंजी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. कबड्डी स्पर्धेत या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक, अडथळा शर्यत धावणे दिया मोहिते हिने प्रथम क्रमांक, शिवम चौगुले याने कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. आहे इयत्ता आठवी गटामध्ये सांघिक रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वैयक्तिक स्पर्धेमध्ये समीक्षा पाटील हिने अडथळा स्पर्धेत प्रथम क्रमांक, २०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक, ४०० मीटर धावणे स्पर्धेतही तिने द्वितीय क्रमांक पटकाविला. ८०० मीटर धावणे सोनम बरुकर हिने प्रथम क्रमांक तर २०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. ८०० मीटर धावणेमध्ये प्रशांत कदम याने द्वितीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. एल. भक्तरी, संजय पाटील, दिनेश श्रेयकर, शिक्षक व एसडीएमसी कमिटीचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *