Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापूर

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला निलजी गावातुन युवकाचा पाठिंबा

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या निलजी ता.बेळगाव गावातून हजारोने पत्रं पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सुनील अष्टेकर, गोपाळ पाटील, …

Read More »

चिखलाने माखला खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्ता

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी डुक्करवाडी, मुडेवाडी रस्ता चिखलाने माखला कारण यंदाच्या मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घातले. अनेक रस्त्याचे तीन तेरा वाजले असताना खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने या रस्त्यावर केवळ शेडू मिश्रीत माती टाकून रस्त्याचे काम केले. त्यामुळेच …

Read More »

पहिले पत्र पाठवून खानापूर युवा समितीच्या उपक्रमाचा शुभारंभ!

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी तुळसा होसुरकर यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता पहिले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व …

Read More »

मुसळधार पावसाने लालवाडी-चापगाव रस्त्यावरील पुल ढासळला

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लालवाडी- चापगाव रस्त्यावरील कारलगा गावजवळील पुलाचा काही भाग नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्यामुळे भविष्यात याचा पुलाला धोका पोहोचू शकतो. त्याच बरोबर याच कारलगा पुलाच्या मधोमध भगदाड पडले आहे. त्यामुळे दुचाकी, अथवा चार चाकी वाहने जाताना धोका संभवतो आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी वाहनाना जाताना …

Read More »

चिखलाचे साम्राज्य पसरले खैरवाड रस्त्यावर

खानापूर (प्रतिनिधी) : रस्ता नव्हे, केवळ चिखलच पसरला आहे. अशी परिस्थिती खानापूर तालुक्यातील खैरवाड गावच्या मुख्य रस्त्यावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.गावापासुन रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या रस्त्यावरून पायी चालत …

Read More »

खानापूरात गवळी धनगर समाजाची सोमवारी बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्ह्यातील गवळी धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या येथील रहिवासी असून त्यांना वन जमिनीचा ताबा कायम मालकी हक्काने मिळाला पाहिजे, यासाठी वन अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत चळवळीची दिशा निश्चित करण्यासाठी सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता येथील रवळनाथ मंदिरात बैठक बोलविण्यात आली …

Read More »

पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास कुप्पटगिरी गावातून पाठिंबा

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य …

Read More »

साहेब फाऊंडेशनवतीने कुसमळी गावात रोगप्रतिबंधक डोस

खानापूर (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशनच्यावतीने रोगप्रतिबंधक औषध वितरण करण्यात येत आहे. काल गुरुवारी खानापूर तालुक्यातील कुसमळी गावात रोगप्रतिबंधक डोस मोहीम राबविण्यात आली. साहेब फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती उज्वला संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्य उत्सव उपक्रम आयोजित …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसवर खड्ड्यांचे साम्राज्य, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबाटी महामार्गाचे 5 कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून पारिश्वाड ते खानापूरातील शिवाजी नगरापर्यंतचे काम करण्यात आले. मात्र जांबोटी क्रॉसवर डांबरीकरणांचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यातच खानापूर-जांबोटी क्रॉसवरच्या प्रवेशद्वारावरच खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या प्रवाशाना तसेच वाहन चालकाना या खड्ड्यातून ये-जा करताना तारेवरची …

Read More »