Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर निवृत्त शिक्षक संघाचा 30 रोजी वर्धापन दिन

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक निवृत्त शिक्षक संघटनेचा 11वा वर्धापन दिन 30 जुलै 2022 रोजी ज्ञानेश्वर मंदिरात दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे

यावेळी माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले यांनी 85 वर्षेपूर्ण झालेल्या संघटनेच्या सभासदांचा सत्कार तसेच राज्यात मराठी माध्यमातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा व 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन उतीर्ण झालेल्या सभासदांच्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी उद्यापर्यंत सचिव ए. एम. पाटील यांच्याशी संपर्क साधावा व सर्व सभासद, पालकवर्गाने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *