Sunday , September 20 2026
Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट

Spread the love

 

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांची आज भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे. निर्णयांच्या स्थगितीबाबत यावेळी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, जी कामं ठाकरे सरकारच्या काळात शेवटच्या काळात घाईत मंजूर झाली त्यांना स्थगिती दिली. अत्यावश्यक कामांना स्थगिती नाही. सरकार बदललं म्हणून लोकविकासाची काम कुठलीही रद्द होणार नाहीत. अत्यावश्यक जी कामं आहेत ती रद्द होणार नाहीत, चुकीच्या पद्धतीनं जी कामं झाली त्यावर मात्र नक्की विचार केला जाईल. घाईघाईने केलेली काम आहेत त्यांना स्थगिती दिली आहे. अधिकार्‍यांचा काहीही प्रश्न नाही, माझी त्यांच्याशी बैठक झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *