Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

ईदलहोंड हायस्कूलची प्रनिषा चोपडे हीला दहावीच्या फेर तपासणीत दोन गुण वाढल्याने मराठी विभागात राज्यात प्रथम

खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूलची विद्यार्थीनी प्रनिषा परशराम चोपडे हिने दहावीच्या परीक्षेत 621 गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली होती. मात्र तिने विज्ञान विषय पेपर फेर मुल्यमापणासाठी अर्ज केला त्यात तिला दोन गुण वाढवून मिळाल्याने 623 गुण मिळाले. आता ती मराठी माध्यमातून राज्यात प्रथम आल्याचे …

Read More »

चिगुळे गावच्या सर्वे नं. 1 मधील 16 एकर जमिनीचा वाद संपवा, ग्रामस्थांची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : चिगुळे (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमिन ही गावची आहे. यावर वैयक्तीक कुणाचा हक्क नाही. यासाठी चिगुळे गावच्या ग्रामस्थांची बैठक सोमवारी दि. 6 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चिगुळे परिसरातील कोदाळी, कणकुंबी, कोलिक, गोल्याळी, तळावडे, आमटे, मान, चोर्ला, हुळंद, बेटणे, खानापूर …

Read More »

निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा : डॉ. श्रीनिवास पाटील

खानापूर : आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणी राहत आहोत याची जाणीव ठेवा आणि निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा. आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या अभ्यासात रस घ्या, असे आवाहन पर्यावरणप्रेमी वनौषधी तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. खानापूर तालुक्यातील जांबोटी हायस्कूल येथे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. …

Read More »

’ऑपरेशन मदत’ दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार व पालकांमध्ये जागृती

बेळगाव : ’ऑपरेशन मदत’च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार व पालकांमध्ये जागृती. ’ऑपरेशन मदत’ च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम शाळेंच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यापैकी गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार घेतला व तेथील …

Read More »

गंगवाळी वनविभागात जागतिक पर्यावरण दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : पृथ्वीमातेचे आपापल्या विध्वंसक कृत्यांमुळे शोषण होत आहे. आणि आपली पर्यावरण प्रणाली लोप पावत आहे. यासाठी पुन्हा पर्यावरण प्रणाली संतुलनात आणण्यासाठी बरीच कारणे आवश्यक आहेत. म्हणून निरोगी आणि टिकाऊ वातावरण केवळ आपल्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. आपण नेहमी जबाबदार वर्तन दाखवुन हवा आणि पाणी तसेच वन्यजीवांचे संरक्षण …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची निवड

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची एकमताने निवड झाली. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य, समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. सुरेश देसाई यांनी गोपाळ देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवले त्याला अनुमोदन …

Read More »

देवाप्पा गुरव यांच्या राजीनाम्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास मध्यवर्तीचा नकार

खानापूर : खानापूर तालुका घटक समिती अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी तब्येतीच्या कारणास्तव संघटनेचे सचिव गोपाळ देसाई यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे त्या राजीनाम्याची एक प्रत गोपाळ देसाई यांनी मध्यवर्तीकडे दिली असता मध्यवर्ती राजीनामा मंजूर करणे किंवा अध्यक्ष निवड करण्याबाबत हस्तक्षेप करणार नाही. या सर्व बाबींवर त्या-त्या घटक समितीने निर्णय …

Read More »

मणतुर्गा येथील म. ए. समितीची निर्धार सभा अपरिहार्य कारणामुळे रद्द

खानापूर : शुक्रवार दिनांक 3 रोजी मणतुर्गा (ता.खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी निर्धार सभा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली. शुक्रवार दिनांक 3 रोजी सभेच्या काही वेळापूर्वी ज्येष्ठ समिती कार्यकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाल्याने ही सभा समिती नेत्यांनी सर्वानुमते रद्द केली. पुढील निर्णय सर्वांच्या विचार …

Read More »

खानापूर समितीची जनजागृती सभा आज मणतूर्गेत

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी जनजागृती सभा आज दि. 3 जून रोजी मणतूर्गे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्व समितीप्रेमी जनतेने सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांनी केले आहे.

Read More »

मणतुर्ग्यात संगीत विशारद पदवी संपादन केलेल्या एम. व्ही. चोर्लेकरांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : मणतुर्गे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व प्राथमिक शिक्षक एम. व्ही. चोर्लेकर यांनी संगीत विशारद (तबला वादक) पदवी संपादन केल्याबद्दल, कु. अंकिता शेलार हिने वकिली पदवी संपादन केल्याबद्दल तसेच यंदाच्या दहावी परीक्षेत तालुक्यात व्दितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रियांका देवलतकर यांचा सत्कार सोहळा मणतुर्गा पंचमंडळी, बालशिवाजी संगीत भजनी मंडळ, सुर्योदय …

Read More »