Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुक्यात घराची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू

Spread the love

 

खानापुर : गेल्या आठवडाभरापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
खानापुर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चुंचवाड गावातील अनंतू धर्मेंद्र पाशेट्टी (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे.
घराशेजारील घरात तो गायी बांधत असे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गोठ्यात गायी चारण्यासाठी जात असताना अचानक भिंत अंगावर कोसळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेत माहिती जमा करून गुन्हा दाखल केला. त्यानंतर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तालुका रुग्णालयात पाठवण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *