Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापूर

शिर्सीतील मराठा नेत्यांचा डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना पाठिंबा

  सर्व समाजासह ‘मराठा’ हितासाठी कटिबद्ध : डॉ. अंजली निंबाळकर खानापूर : विकासापासून वंचित असलेल्या सर्व घटकांच्या उन्नतीबरोबरच मराठा समाजाच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली. मतदारसंघातील मराठा समाजाच्या प्रमुखांसोबत त्यांनी रविवारी (दि. ७) शिर्सीतील बैठकीत चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत …

Read More »

भाजप कार्यकर्त्याकडून मराठा समाजाचा अपमान; कुमठा पोलिसात तक्रार दाखल

  कारवार : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर या मराठा असल्याने त्यांना उद्देशून उत्तर कन्नडमध्ये मराठा पिडा कशाला आणला असा अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान कुमठा येथील भाजपा कार्यकर्त्याने केला असून त्याच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एच. नायक यांनी कुमठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघातून निरंजन सरदेसाई म. ए. समितीचे उमेदवार!

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या माध्यमातून समितीला पुन्हा नव्याने बळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यातून …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी स्वीकारला काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म

  खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मंत्री श्री. मानकालू वैद्य आणि कित्तुरचे आमदार श्री.बाबासाहेब पाटील तसेच शिरसीचे आमदार श्री. बिम्मण्णा नायक …

Read More »

काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर १६ एप्रिलला अर्ज दाखल करणार

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक १६/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता कारवार येथे दाखल करणार आहेत. कारवार लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १६ तारखेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज (नॉमिनेशन) कारवार येथे भरणार आहेत. यावेळी कारवार जिल्ह्यातील …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासंदर्भात समितीची रविवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 07/04/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

समितीची बदनामी करून मतांची गोळाबेरीज करण्याचा राष्ट्रीय पक्षांचा डाव…

  (८) लोकसभा निवडणुकीसाठी आता दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. एकीकडे एक एक जागा जिंकण्यासाठी राष्ट्रीय पक्षांची धडपड सुरू असताना दुसरीकडे सीमाभागात मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. बेळगाव लोकसभेसाठी यंदाही समितीची बांधणी सुरू असताना खानापूर घटक समितीने सुद्धा कारवार लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. …

Read More »

खानापूर समितीकडे निरंजन सरदेसाई, रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढविणार असल्याने इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार आज खानापूर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई व समितीचे सदस्य हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील या दोघांनी आपला अर्ज समितीकडे सादर केला आहे. …

Read More »

कणकुंबी चेकपोस्टवर 7,98000/- लाख रुपये जप्त

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टवर समर्पक कागद्पत्रांविना वाहनातून नेण्यात येणारी 7,98000/- लाख रुपये रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली. 14-खानापूर विधानसभा मतदार संघातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी तपासणी नाक्यावर गोव्याहून येणारी केए-29 एफ-1532 क्रमांकाची कार एसएसटी पथकाने अडवून तपासणी केली. बैलहोंगल तालुक्यातील गांधीनगर गल्ली, वन्नुर येथील संजय बसवराज रेड्डी ही …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर म. ए. समिती निवडणूक लढविणार!

  खानापूर : निवडणुका हा सीमालढ्याचा एक भाग आहे. म्हणूनच समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच मराठी भाषिकांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी समितीला निवडणूक लढवावीच लागेल, असा सुर युवा कार्यकर्त्यातून उमटत असल्यामुळे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार …

Read More »