Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे नूतन शैक्षणिक कक्ष, क्रीडा भवन आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा शाळा स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे तो शिक्षित झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याला जे जे काही हवे असेल ते प्राप्त करून देण्यासाठी या समाजातील सेवाभावी संस्था नेहमी तत्पर असतात आणि त्यानी आपल्या या संस्थेतील शाळेसाठी जे …

Read More »

अपघातात जखमी झालेल्या लैला शुगरचे पर्सनल मॅनेजर मनोहर किल्लारी यांचे उपचारादरम्यान निधन

  खानापूर : लैला शुगर फॅक्टरीचे पर्सनल मॅनेजर व खानापूर तालुक्यातील गुंड्यानहट्टी गावचे रहिवासी मनोहर किल्लारी (वय 45 वर्ष) दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान काल बुधवारी मध्यरात्री त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे लैला शुगर फॅक्टरीतील कर्मचारी वर्ग व गुंड्यानहट्टी …

Read More »

खानापूर भागात उद्या १२ जून आणि १४ जून रोजी वीजपुरवठा खंडित

  खानापूर : खानापूर भागात उद्या दि. १२ जून आणि १४ जून रोजी १२ ते सायंकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे 110 केव्ही खानापूर उपकेंद्रातून पुरवठा होणारी वीज खंडित करण्यात येणार आहे. लैला साखर कारखाना, देवलत्ती, बिदरभावी, भंडारगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बोरगाव, निडगल, दोड्डहोसूर, …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूरमध्ये पी. यु. सी. विद्यार्थ्यांनींचे चक्क बैलगाडीमधून भव्य स्वागत!

  खानापूर : तसा महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवास हा रोमांचकारी असतो. स्वप्नांपेक्षा मोहक आणि कल्पनांपेक्षा सुबक असणारा हा प्रवास वळणदार व आनंददायी व्हावा यासाठी म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे पी यु सी प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनींचा स्वागत समारंभ दिनांक 05 जून 2025 रोजी …

Read More »

कुसमळी येथील नदीवरील पर्यायी पुलाची दुरुस्ती; दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला

  खानापूर : बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल खचल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक रविवारी सायंकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी दिवसभर पर्यायी खचलेल्या रस्त्यावर दगड, माती टाकून काँक्रीट घालून सदर रस्ता मंगळवारपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला केला आहे. बेळगाव-जांबोटी-गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूरमार्गे …

Read More »

मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्यापासून; मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याची दुकाने सज्ज

  खानापूर : मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्या मंगळवार दिनांक 10 व बुधवार दिनांक 11 जून असे दोन दिवस चालणार आहे. या अगोदर गावात चार मंगळवार पाळण्यात आले. हा पाचवा मंगळवार मूर्ग नक्षत्र सुरू झाल्यावर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीची यात्रा भरते. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मंदिरासमोर मंडप घालण्यात …

Read More »

बेळगाव – चोर्ला रोडवरील कुसमळी रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

  खानापूर : बेळगाव – चोर्ला रोड वरील कुसमळी रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तात्पुरता बनवलेल्या रस्त्याच्या पुलावरची माती खचल्याने रविवारी पुन्हा हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन जुना पुल काढून त्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात येत आहे. …

Read More »

खानापूर तालुक्यात नव्या आचारसंहितेत पार पडले लग्न

  खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव विनय व खानापूर तालुक्यातीलच अल्लेहोळ या गावचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग सटवाप्पा पाटील यांची कन्या मयुरी यांचा शुभविवाह रविवार दि. 08 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजून 38 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नंदगड येथील दक्षिण विभाग सोसायटीच्या हॉलमध्ये हा विवाह …

Read More »

मौजे वड्डेबैल येथे वृक्षारोपण कार्यक्रम

  खानापूर : तालुका खानापूर वड्डेबैल ग्रामस्थ व श्री महालक्ष्मी सेवा अभिवृद्धी संघ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आयोजित करण्यात आला होता. सदर गावामध्ये महालक्ष्मीचे मंदिर आकार घेत असून परिसरामध्ये स्वच्छता व वृक्षवेलीचे महत्व जाणून घेऊन कार्यकर्त्यांनी प्रत्येकी एक वृक्ष प्रमाणे लागवड केली व जोपासना करण्याची प्रतिज्ञा …

Read More »

जांबोटी विद्यालयास आयएएचव्हीकडून पुस्तकांची देणगी; वाचनालय झाले समृद्ध

  जांबोटी : आर्ट ऑफ लिविंग यांच्या “आंतरराष्ट्रीय मानवी मूल्य संस्था”(आयएएचव्ही) यांच्याकडून जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या वाचनालयास पन्नास हजार रुपयांच्या पुस्तकांची देणगी देण्यात आली. श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेतून मराठी, इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषेतील दर्जेदार साहित्यिकांची सुमारे साडेपाचशे पुस्तके विद्यालयाकडे नुकताच एका कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाच्या …

Read More »