Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

गर्लगुंजी येथील वेंटेड डॅमचे काम त्वरित करा : सहाय्यक कृषी निर्देशकांना निवेदन

खानापूर : गर्लगुंजी येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेड डॅमचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप यांना देण्यात आले. गावातील 70 ते 80 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत हे …

Read More »

आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू

  मेंढेगाळी गावचा रहिवासी भांबार्डी परिसरात घडली दुर्दैवी घटना खानापूर : भांबार्डी (ता. खानापूर) गावाजवळील शेतातील आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ७ मे) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृताचे नाव रवळनाथ नारायण गुरव (वय ४५, मूळगाव मेंढेगाळी, ता. खानापूर; सध्या रा. शिवणे, पुणे) …

Read More »

बेळगाव – धारवाड थेट रेल्वे मार्गासंदर्भात गर्लगुंजी परिसरातील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

  खानापूर : केआयएडीबीने शेतकऱ्यांना नोटीस पाठविलेल्या होत्या त्यावर शेतकऱ्यांनी केआयएडीबी ऑफिसला जाऊन आपला विरोध नोंदविला होता, नंतर दुसऱ्या वेळी बेळगाव येथे विरोध नोंदविला. अनेकवेळा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध करून वापस पाठविले, मात्र रेल्वे अधिकारी थोडीशी जमीन घेतली जाणार म्हणून सांगत असतानाच आता फक्त बेळगाव जिल्ह्यातून 1200 एकर जमीन अधिग्रहित केली …

Read More »

“जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” : अवनिशला भावपूर्ण श्रद्धांजली!!

    “जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचा सर्वांचा लाडका हसतमुख असा कुमार अवनिश विनोद देसाई मुळगाव डोंगरगाव सध्या राहणार पणजी गोवा याची दि. 26 एप्रिल 2025 रोजी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. आज अकराव्या दिवसानिमित्त त्याच्याविषयी थोडक्यात… कुमार अवनिश हा ओल्ड गोवा ग्रामपंचायतचे सदस्य विनोद देसाई व …

Read More »

शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

  खानापूर : खानापूर-परीश्वाड मार्गावरील कुप्पगिरी क्रॉसजवळ शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून सदर घटना आज सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव संजय वैजनाथ …

Read More »

चोर्ला गावानजीक मालवाहू रिक्षा आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

  खानापूर : बेळगाव – गोवा मार्गावरील चोर्ला गावानजीक आज शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास अशोक लेलँड मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने कणकुंबी येथील युवक विक्रम कोळेकर (वय 28 वर्ष) हा युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, विक्रम …

Read More »

किरण पाटील यांना राष्ट्रीय क्रीडा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील शिक्षक व येळ्ळूर येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या गणेबैल हायस्कूल गणेबैलचे क्रीडा शिक्षक श्री. किरण राजाराम पाटील यांना गोवा येथील आयोजित एका कार्यक्रमात क्रीडाशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या संयुक्त …

Read More »

सकल मराठा समाज जागृती सभेचे आज खनापूरात आयोजन

  जगद्गुरु श्री मंजुनाथ स्वामीं उपस्थितीत राहणार खानापूर : खानापूर लक्ष्मी मंदिर या ठिकाणी आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता खानापुरातील मराठा समाज बांधवांसाठी सकल मराठा जागृती महासभेचे आयोजन करण्यात आले असून ही सभा पक्षविरहित आहे. सर्व राजकीय पक्षातील मराठा समाज बांधवांनी व मराठा समाजाच्या प्रमुख व्यक्तींनी …

Read More »

शिवस्मारक इमारतीला तडे; तातडीने वृक्ष हटवण्याचे आमदार हलगेकर यांचे आदेश

  खानापूर : खानापूर येथील “राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक” इमारतीच्या मागील बाजूला जुन्या कोर्ट आवारातील. एका मोठ्या झाडांची मुळे आणि बुंध्यामुळे इमारतीला तडे गेले आहेत. मागील दोन वर्षांपासून हे धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु, या आवारातील बेकायदेशीर बांधकामांना वाचवण्यासाठी तालुका पंचायतीकडून टाळाटाळ केली जात …

Read More »

संविधान रक्षणासाठी काँग्रेसचा नेहमीच संघर्ष : डॉ. अंजली निंबाळकर

  पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोव्यातील पणजी येथे काँग्रेसतर्फे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण करताना सांगितले की, आज महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संविधानाच्या रक्षणासाठी, …

Read More »