खानापूर : मावशीच्या गावी जत्रेला आलेल्या युवकाचा तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देमिनकोपमध्ये (ता. खानापूर) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. तरुण चलवादी (वय २१, रा. कंचनोळी, ता. हल्ल्याळ) येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, …
Read More »विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक छळ; इदलहोंड येथील प्रकार
खानापूर : एका विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीने सदर महिलेवर व तिच्या पतीवर आज अचानक वीटभट्टीवर काम करत असताना हल्ला चढवून महिलेच्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार इदलहोंड येथे घडला. मिळालेल्या माहितीनुसार, काजल मल्लप्पा पुजारी (मूळ रचाकट्टी, हुक्केरी) ही विवाहित महिला काही …
Read More »गाडीकोप खून प्रकरणी नवी कलाटणी; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा!
खानापूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बलोगा गावात घडलेल्या खून प्रकरणी वेगळीच कलाटणी मिळाली असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलोगा गावात दोन दिवसांपूर्वी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी २४ तासात पोलिसांनी आरोपीला …
Read More »खानापूर परिसरात चोरट्यांचा हैदोस; आठ घरातील लाखोंचा ऐवज लंपास
खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करत आठ घरांची तोडफोड केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक लाळसाब गौंडी यांच्यासमोर या गुन्ह्याचा तपास मोठे आव्हान ठरणार आहे. खानापूर तालुक्यातील गुंजी, करंबळ आणि देवलत्ती या …
Read More »४ वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरण; पोक्सोअंतर्गत आरोपीला २० वर्षांची शिक्षा
खानापूर : नंदगडमध्ये ४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६८ वर्षीय नराधमाला न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे. ही संतापजनक घटना २४ फेब्रुवारी २०२४ रोजी नंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. निसार अहमद फक्रू साब चापगावी (वय ६८, रा. काकर गल्ली, नंदगड) याने चॉकलेटचे आमिष …
Read More »सात महिन्यापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह सापडला भूतनाथ डोंगरावर!
खानापूर : गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता असलेले झाडअंकले येथील रहिवासी मारुती उसुरलकर (वय वर्षे 75) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत भूतनाथ येथील डोंगरावर सांगाड्याच्या स्वरूपात सापडला आहे. मृतदेहाची प्राथमिक ओळख त्यांच्या मृतदेह शेजारी असलेल्या चप्पल, छत्री व गळ्यातील वारकरी माळ यावरून पटविण्यात आली आहे. मात्र सरकारी नियमाप्रमाणे डीएनए परीक्षण …
Read More »गाडीकोप खून प्रकरणाचा २४ तासात छडा : आरोपीला शिवमोग्गातून अटक
खानापूर : बेळगावमधील खानापूर तालुक्यात दगडाने ठेचून करण्यात आलेल्या भीषण हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवमोग्गा मधून एका आरोपीला अटक केली आहे. बलोगा, तालुका खानापूर येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय ४७) या इसमाची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सदर व्यक्तीचा मृतदेह खानापूर ते एम. के. हुबळी रस्त्यावरील गडीकोप गावानजीक असणाऱ्या …
Read More »विद्युत तारेच्या स्पर्शाने इदलहोंड येथे 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर : विद्युत तारेच्या स्पर्शाने 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे घडली. बुधवारी (2 एप्रिल) सायंकाळी 5.45 वाजता ही दुर्घटना घडली. मनाली मारुती चोपडे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. इदलहोंड आणि सिंगिनकोप या लागून असलेल्या गावांजवळ मारुती चोपडे यांचे घर आहे. त्यांच्या …
Read More »खानापूर तालुक्यातील गाडीकोप येथे एकाचा दगडाने ठेचून खून
खानापूर : खानापूर – एम. के. हुबळी मार्गावरील गाडीकोप रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत खानापूर तालुक्यातील बलोगा येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय 48) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना काल दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. मयत शिवनगौडा याचा भाऊ सन्नगौडा पाटील यांनी याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली …
Read More »मणतुर्गे (ता. खानापूर) येथील श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन…
खानापूर : मणतुर्गे (ता. खानापूर) येथे गुढीपाडव्या निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta