Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापूर

खानापूरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेचा जनहित व जनजागृती कार्यक्रम संपन्न

  खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना र. घटक यांची खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता मासिक बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष श्री. बनोशी आणि प्रमुख पाहुणे श्री. चांगाप्पा निलजकर तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक, अरविंद कुलकर्णी, योगगुरु हलकर्णी, सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व …

Read More »

धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेशबंदी

खानापूर : जांबोटी, कणकुंबी भागातील चिखले, पारवाड, माण व चिगुळे परिसरातील धबधब्यांचा व वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी खानापूर बेळगाव परिसरांमधून शेकडो तरुण-तरुणी येतात. कणकुंबी परिसरातील धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करून दंगामस्ती करणे व आरडाओरडा करणे अशा प्रकारामुळे या भागातील नागरिकांना गेल्या काही वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वनखाते …

Read More »

‘गृहलक्ष्मी’साठी 19 जुलैपासून अर्ज दाखल प्रक्रियेस प्रारंभ

  बेंगळुरू : मुख्य गृहिणीच्या खात्यात मासिक 2000 रुपये अनुदान देणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेसाठी 19 जुलैपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होणार आहे. बेंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या की, गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज सादर करणे 19 जुलैपासून सुरू होईल. कर्नाटक वन, ग्राम वन, बापूजी …

Read More »

गर्लगुंजीत शाॅर्टसर्किटमुळे आग लागलेल्या फळ बागेच्या नुकसान भरपाईची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर ३१६ मधील दोन एकर जमिनीतील नारायण दत्ताजीराव पाटील यांच्या मालकीच्या फळ बागेला शाॅकसर्किटमुळे आग लागून लाखोचे नुकसान झाले. यासंदर्भात बागायत खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता. बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी हेस्काॅम खात्याकडे बोट करून आपली जबाबदारी झटकली आहे. याबाबत मिळालेली माहिती …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील जागेवर तहसील कार्यालयाने दाखवला हक्क

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅस येथे असलेल्या १६ गुंठे जमिनीवर खानापूर तहसील कार्यालयाने आपला हक्क बजावत तारेचे कुंपण घालून जागेचे संरक्षण केले. गेल्या कित्येक वर्षांपासून जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅसवर अनेक गाळे चालु होते. मात्र गेल्या वर्षी महामार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण, गटारी व डांबरीकरण करण्याच्या …

Read More »

खानापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण!

  खानापूर :  खानापूर साठीही असाच एक अभिमानाचा क्षण आला आहे. कारण संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असणारी इस्रोची चांद्रयान -3 मोहीम आज शुक्रवारी दुपारी पार पडत असून या मोहिमेत खानापूरच्या प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचे योगदान आहे हे विशेष होय. देशाच्या इतिहासात आजचा शुक्रवार 14 जुलै हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला …

Read More »

खानापूर-बेळगाव सटल बस सुरू करा; खानापूर वकील संघटनेचा रस्ता रोको

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये-जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बससेवा सुरू करा. या मागणीसाठी खानापूर …

Read More »

कामकुमार नंदी महाराजांच्या हत्येच्या निषेधार्थ खानापूर तहसील कार्यालयावर हिंदू संघटनेचा मोर्चा

  खानापूर : हिरेकुडी (ता.चिकोडी) येथील नंदी पर्वत आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरूवारी दि. १३ रोजी खानापूर तालुका हिंदु संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. प्रारंभी खानापूर …

Read More »

बरगाव येथील मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक ताब्यात

  खानापूर : रात्रीच्या सुमारास मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक चोरटा हाती लागला. प्रज्वल प्रकाश वागळेकर (वय 21) रा. बरगाव, तालुका खानापूर असे हाती लागलेल्या संशयीत चोरट्याचे नाव असून हातातून निसटलेली जोडगोळीही बरगावचीच असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी रोडवरील बरगाव जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरातील साई मंदिरातील दानपेटी …

Read More »

मणतुर्गा येथे भरदिवसा घरफोडी; 5 लाखाचा ऐवज लंपास

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे बुधवारी दुपारी दरम्यान घराचा पाठीमागील दरवाजा तोडून तिजोरीतील सोने, चांदीच्या ऐवजासह रोख रक्कम मिळून 5 लाखाचा चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत मिळालेली माहिती की, मणतुर्गा येथील अल्बेट मोनु सोज हे घरचा दरवाजा बंद करून शेतवडीकडे कामासाठी गेले होते. त्यांचे घर असोगा रोडवरील गावच्या वेशीत …

Read More »