Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

    खानापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. उदय पाटील यांनी केले आहे. खानापूर येथील शिवस्मारक येथे शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांतर्फे मंगळवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

चन्नेवाडी शाळा होणार सुरू : गटशिक्षणाधिकारी

  बेळगाव : गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी ता.खानापूर येथील शाळा सुरू करण्याच्या पालकांच्या व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येतांना दिसून येत आहे, आज गावकरी मंडळी व पालकांनी खानापूर गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. शाळा तात्कालीन शिक्षकांच्या सोयीस्कर वागण्यामुळे कशी …

Read More »

रामनगर येथे पांढरी नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

  खानापूर : रामनगर येथील पांढरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 12 रोजी सायंकाळी घडली. हुबळी येथील मेहबूब मुबारक पठाण (वय 11) आणि चर्च गल्ली रामनगर येथील आफण असफाक खान (वय 12) अशी बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ योजनांबाबत मंगळवारी मार्गदर्शन

  खानापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत मंगळवार (ता. १४) रोजी खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा खानापूर तालुक्यासह सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी

    खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजच्या पिढीने पुढे जाणे गरजेचे असून प्रत्येकाने मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी देखील मावळा बनून पुढे यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरूवारी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी …

Read More »

खानापूर समितीच्या वतीने उद्या शिवजयंती साजरी होणार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरूवारी (ता. ९) सकाळी ८ वाजता शिवजयंती निमित्त शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सीमाभागात परंपरेप्रमाणे गुरुवारी शिवजयंती साजरी केली जाणार तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवजयंती साजरी करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत, सवलतीत प्रवेश योजना

  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत, सवलत प्रवेश योजना राबविण्यात येणार आहे. याचा ८६५ मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सवलत प्रवेश योजना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ तर …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघातून डॉ. अंजलीताई निंबाळकर बाजी मारणार!

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्यातील महिलेला उमेदवारी दिल्यामुळे सर्वत्र नवचैतन्य पसरले आहे. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी महाराष्ट्रातून येऊन खानापूर सारख्या दुर्गम भागात आपल्या समाजसेवेला सुरुवात केली. त्याचीच पोचपावती म्हणून खानापूरवासीयांनी त्यांना एकदा आमदार म्हणून निवडून दिले. पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात भाजपचे सरकार असून देखील …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघात समिती इतिहास रचेल : आबासाहेब दळवी

  खानापूर : जोयडा तालुक्यातील मराठा समाज व मराठी भाषिकांची साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी रामनगर, शिंगरगाव, वैजगाव आदी भागात प्रचार फेरी काढून …

Read More »

कारवार येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भव्य दुचाकी रॅली

  कारवार : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार सतिश सैल यांनी दुचाकी चालवून लक्ष वेधून घेतले. हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीत …

Read More »