खानापूर : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल महाविद्यालय, बिडी, ता. खानापूर येथील विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत व कसरत करत उत्तम खेळ केला. यामध्ये कु. सुरेखा गिडप्पणावर, विजयालक्ष्मी गाडेकर, कावेरी मालकी, देमक्का हिंडलकर, सरीता भेकणी, राधिका गिडप्पणावर, तेजस्विनी गौडर …
Read More »तोपिनकट्टी येथे दोन गटात संघर्ष; दोन्हीकडून दगडफेक
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी गावात काल रात्री एका किरकोळ मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाली. रात्री घडलेल्या घटनेप्रमाणेच आज सकाळीही दोन गटात हाणामारी झाली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी गावात जाऊन सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनीही तोपिनकट्टी गावात तळ ठोकला होता. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. एकूणच …
Read More »खानापूर तालुका समितीच्या वतीने मान्यवरांचा 24 रोजी सत्कार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक व निमलष्करी दलात नियुक्त झालेल्या खानापूर तालुक्यातील मराठी तरुणींचा तसेच चांद्रयान-३ २०२३ या मोहिमेत यशस्वी झालेल्या इस्रोचे कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्याचे आयोजिले आहे. खानापूर तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे आहेत. …
Read More »खानापूरातील बकरी बाजारात करोडो रुपयांची उलाढाल
खानापूर : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे उंदरी. गणपतीचे वाहन असणाऱ्या उंदराला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार नैवद्य दाखविण्याची प्रथा काही भागात आहे. यानिमित्ताने आज रविवारी 17 सप्टेंबर रोजी खानापूरच्या आठवडी बाजारात बकरी बाजार भरला होता. बकरी बाजारात यावर्षी करोडो रुपयांची उलाढाल …
Read More »आयशरची ट्रकला धडक; एक ठार, चार जखमी
खानापूर : नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी लॉरीला पाठीमागून आयशर ट्रकने जोराची धडक दिल्याने संगरगाळी गावचे नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर (वय 65) यांचा पाय निकामी झाल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की, माडीगुंजीहून खानापूरकडे येत असलेल्या आयशर ट्रकने नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला …
Read More »खानापूर शहर गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर
खानापूर : खानापूर शहर सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष श्री. पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर तहसिलदार श्री. प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर केले. निवेदनात असे म्हटले आहे की, या वर्षी पाऊस हा फार कमी झाला त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून नदी, नाले …
Read More »आवरोळी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
खानापूर : कर्जाचा बोजा सहन न झाल्याने विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील आवरोळी गावात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, महेश लक्ष्मण नागन्नावर (वय 50) या शेतकऱ्याला कर्जाचा बोजा जास्त झाला होता. त्यांनी अनेक सोसायटी, बँका, फायनान्स मधून कर्जे काढली होती. त्यातच पाऊस नसल्याने 4 …
Read More »ढोकेगाळी – हरूरी रस्त्यावर अस्वलाचा दुचाकीस्वारावर हल्ला
खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी – हरूरी गावांच्यामध्ये दोन पिल्लांसह वावरणाऱ्या एका अस्वलाने दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सदर घटना आज सकाळी 9.30 दरम्यान घडली. दुचाकीचा वेग वाढविल्याने दुचाकीस्वार बचावला. ही घटना पाठीमागून चालत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरवरून पाहिली. घाबरलेल्या त्या मुलांनी धावत ढोकेगाळी गावातील स्वतःचे घर गाठले. या घटनेमुळे येथील …
Read More »खानापूर तालुक्यातील कांही गावांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी वीज खंडित
खानापूर : कर्नाटक विद्युत पारेषण महामंडळाच्या वतीने वीज क्षमता वाढविण्याच्या कामामुळे खानापूर तालुक्यातील बीडी गावातील 110 केव्ही सबस्टेशनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या भागात शुक्रवार 15 सप्टेंबर व शनिवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हिंडलगी, मंगेनकोप्प, केरवाड, बीडी, कक्केरी, चुंचवाड, रामापुर, सुरापुर, गोलिहळ्ळी, …
Read More »खानापूर तालुक्यातील सागरे येथे भरदिवसा घरफोडी
खानापूर : खानापूर तालुक्यात घरफोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. समोरील कुलूप बंद दरवाजा पाहून पाठीमागच्या दरवाजाने घरफोडीचे प्रकार घडत असतानाही घरात दागिने पैसे ठेवून कुलूप बंद घरे करून बाहेर जाणे धोक्याचे ठरत आहे. असाच प्रकार बुधवारी खानापूर तालुक्यातील सागरे गावात घडला. सागरे येथे बंद घरांचे कुलूप तोडून 5 तोळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta