Monday , September 21 2026
Breaking News

बसला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

Spread the love

 

खानापूर : बेळगावहून खानापूरकडे महामार्गावरून येणाऱ्या एका बसला दुचाकीस्वाराने ठोकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना महामार्गावरील इदलहोंड सर्विस रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव लक्ष्मण बसाप्पा पुजारी (वय 23) करविनकोप्प तालुका बेळगाव असे असल्याचे समजते. याबाबत मिळालेली माहिती की, बेळगावहून खानापूर आगाराकडे ईदलहोंड सर्विस रस्त्यावरून बस येत असताना इदलहोंड सर्विस रस्त्यावरून उलट दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने बसला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीसात झाली असून पोलीस गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक गिरीश एम यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश एम यांनी तपास जारी केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *