Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणी

कोगनोळी येथे पुराच्या पाण्याने पडझड झालेल्या घरांचा सर्वे कधी?

नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज : घरांच्या सर्वेची प्रतीक्षा कोगनोळी : मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोगनोळी येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर या पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असला तरी शासनाकडून अद्याप सर्वे करण्यात आला नसल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील दुधगंगा …

Read More »

उत्सवाला परवानगी न दिल्यास धरणे आंदोलन

तहसीलदारांना निवेदन : पोलिसांनीही दबाव आणू नये निपाणी : यावर्षी होणार्‍या गणेशोत्सवावर कर्नाटक सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही यावर्षीही बैठक घेऊन सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे. तरी सदर गणेश मंडळांच्या सर्व अटी व नियम आपण मान्य करून गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे. …

Read More »

कोरोनाच्या छायेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन

विद्यार्थ्याविनाच शाळेसमोर ध्वजारोहण: सर्वच कार्यक्रमांना फाटा निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोना संसर्गामुळे रविवारी (ता.15) अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय व इतर सामाजिक संघटनातर्फे आयोजित सर्वच कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. शिवाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ध्वजारोहण केले. येथील नगरपालिका कार्यालय आणि डॉ. आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासमोर नगराध्यक्ष …

Read More »

हिंदू सणावरील निर्बंधाबाबत तहसीलदारांना आज निवेदन

  श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ : संभाजी चौकात जमण्याचे आवाहन निपाणी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी येथील श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ व निपाणी परिसरातील गणेश उत्सव मंडळ व्यावसायिकांच्या वतीने महादेव मंदिर येथे पहिली बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (ता.15) नगरसेवकांच्या दुसरी बैठक झाली. त्यामध्ये हिंदू सणावर …

Read More »

नुकसानग्रस्तसह बेरोजगार कुटुंबांना अक्कोळ येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

निपाणी : कोरोना काळात रोजगाराविना हालाखीचे जीवन काढणार्‍या अक्कोळ येथील 29 कर्मचार्‍यांना तसेच अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या 43 कुटुंबाना शासनाकडून उपलब्ध झालेल्या व जोल्ले उद्योग समूहाच्यावतीने जीवनावश्यक कीटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अक्कोळ येथील जोल्ले उद्योग समूह कार्यालयात आयोजक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब पाटील (कट्टीकल्ले) होते. प्रारंभी शाखाधिकारी प्रदीप देसाई यांनी …

Read More »

कोगनोळी जवळ अपघातात दोन कारचे नुकसान

दोघे जण किरकोळ जखमी : कारचे हजारो रुपयांचे नुकसान कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या आरटीओ ऑफिस जवळ दोन कारच्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 16 रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती कार क्रमांक एमएच 12 के.टी. 9934 ही गाडी निपाणीहून कोल्हापूरकडे जात …

Read More »

’एसटी’ला आता विषाणूरोधक कोटिंग!

परिवहन मंडळाचे एक पाऊल पुढे : सुखकर अन् आरोग्यदायी होणार प्रवास निपाणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी जरी असला तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासाच्या माध्यमातून पसरू नये व प्रवाशांना सुरक्षितता वाटावी, यासाठी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. कोटिंग हे प्रभावशाली झाले का नाही हे …

Read More »

मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध

मंत्री शशिकला जोल्ले : कोगनोळी येथे आहार किटचे वितरण कोगनोळी : 2008 साली मी या मतदारसंघात आले. तेव्हापासून आतापर्यंत मतदारसंघात संकट आले व मी आले नाही असे कधी झाले नाही. परवा आलो नाही याच्या पाठीमागे माझी वैद्यकीय कारण होते. त्यामुळे मी येऊ शकलो नाही याचा अर्थ विरोधकांनी वेगळा काढला. विरोधकांच्या …

Read More »

फांद्या छाटणीच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची तोड

हेस्कॉमची कुर्‍हाड : छाटणी अशास्त्रीय असल्याचा आरोप निपाणी : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर हेस्कॉमकडून शहरातील वीजतारांना अडथळा ठरणार्‍या उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणी केली जाते. मात्र निपाणी शहर आणि उपनगरात मजुरांकडून अशास्त्रीय पद्धतीने फांद्या छाटल्या जात आहेत. फांद्या नसल्याने झाडे धोकादायक होऊन वादळवार्‍यात उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे …

Read More »

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे

बंदोबस्त कडक : आरटीपीसीआरची मागणी कोगनोळी (वार्ता) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे असून या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची मागणी करण्यात येत आहे. सोमवार तारीख 9 रोजी दिवसभरामध्ये 51 चारचाकी वाहनातून सुमारे 200 प्रवाशांनी आपला रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश …

Read More »