निपाणीच्या गुरुनाथ पुजारीचे यश; आई-वडिलांचे स्वप्न साकार निपाणी (वार्ता) : गावोगावी, यात्रा-जत्रामध्ये हातगाडीवर आईस्क्रिम विक्रिचा व्यवसाय करीत आपला मुलगा कांहीतरी करावा, त्याचे देश सेवेत योगदान रहावे, या ध्येयाने प्रेरित होवून येथील दिवेकर कॉलनीतील विजय पुजारी यांनी अथक परिश्रम घेत आपला मुलगा गुरूनाथ पुजारी यांना स्वतः अर्धपोटी राहून शैक्षणिक सोयी …
Read More »नियमबाह्य प्लॉट विक्रीचा दोन दिवसात अहवाल सादर करा
प्रांतांधिकाऱ्यांचे आदेश : जागा मालकांना देणार नोटीस निपाणी : कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील बालाजीनगर वसाहतीत जागा मालकाच्या मनमानीमुळे नियमबाह्य प्लॉटविक्री झाल्यामुळे आजपर्यंत येथे कोणत्याच नागरी सुविधा मिळाल्या नसल्याची तक्रार रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर गुरुवारी चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी अधिकाऱ्यांसह बालाजीनगरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांनी …
Read More »‘जिनधर्म प्रभावक’ पदवीने सहकाररत्न रावसाहेब पाटील सन्मानित
निपाणी (वार्ता) : बंगळूर कर्नाटक जैन असोसिएशनतर्फे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील यांना ‘जिनधर्म प्रभावक’ पदवीने सन्मानित करण्यात आले. रावसाहेब पाटील यांच्या अनुपस्थितीत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळूर येथील कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला. दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून रावसाहेब पाटील यांनी गेल्या १५ वर्षापासून कर्नाटक-महाराष्ट्रात जैन …
Read More »संभाजीनगर, शिंदे नगर मधील समस्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील प्रभाग क्रमांक १९ मधील संभाजीनगर आणि प्रभाग क्रमांक २० मधील शिंदे नगरमध्ये ४ हजार लोकसंख्या आहे. पण या दोन्ही नगरामध्ये सार्वजनिक शौचालये रस्ते अंगणवाडी अभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नगरपालिकेला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून आपण या दोन्ही नगरामध्ये भेट …
Read More »समाजातील औरंगजेबांना रोखा : रमाकांत कोंडुसकर
निपाणीत संभाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण निपाणी (वार्ता) : धर्मासाठी बलिदान कसे द्यावे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्ववावरून दिसून येते. युवा पिढीने त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्याचे आचरण करावे. भारत मातेचे सौभाग्य टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. असे असताना केवळ स्वार्थासाठी महापुरुषांची नावे घेणे चुकीचे आहे, असे मत श्रीराम …
Read More »व्यवस्थापनाचे निर्णय प्रगतीसाठी दिशादर्शक
डॉ. सी. बी. कुरबेट्टी; ‘महात्मा बसवेश्वर’ची त्रैमासिक सभा निपाणी (वार्ता) : संस्थेची प्रगती ही तेथील व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यवस्थापनाने घेतलेले बरे-वाईट निर्णय संस्थेच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरतात, असे मत येथील महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. येथील गांधी चौक येथील व्यंकटेश मंदिरात झालेल्या …
Read More »निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील
उपाध्यक्षपदी नवाळे, सचिवपदी खोत यांची निवड निपाणी (वार्ता) : तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अनिल नवाळे व सेक्रेटरीपदी सोमनाथ खोत यांची एकमताने निवड करण्यात आली. शनिवारी तालुका पत्रकार संघाचा कार्यक्रम जवाहरलाल तलाव येथील फिल्टर हाऊस परिसरात झाला. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अमर गुरव, उपाध्यक्ष …
Read More »बोरगाव जनता पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी शंकर माळी, उपाध्यक्षपदी मुरारी ऐदमाळे निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील जनता को- ऑप क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गोविंदगौडा पाटील यांनी केली. सर्व संचालकांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष शंकर माळी, उपाध्यक्षपदी मुरारी ऐदमाळे यांची निवड करण्यात आली. नवीन निवड झालेल्या संचालकामध्ये अण्णासाहेब पाटील, …
Read More »प्रस्तावित तलावाच्या कामासाठी आपण प्रयत्नशील
पालकमंत्री सतीश जारकीहोळी; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयावर चर्चा निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अचानकपणे निपाणीस भेट देऊन प्रशासकीय अधिकारी, नेते कार्यकर्त्यांशी चर्चा केली केली. निपाणी तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. शहरवासीयांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन प्रस्तावित तलाव कामासाठी आपण …
Read More »निपाणी पाणी प्रश्नावर खडाजंगी
अभियंते अधिकारी निरुत्तर: पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक निपाणी (वार्ता) : शहरातील पाणीप्रश्नासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका प्रशासन व कंत्राटदार यांची संयुक्त बैठक नगरपालिकेत शुक्रवारी (ता.५) झाली. यावेळी नगरसेवकांनी कंत्राटदार अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. याशिवाय पाणीपुरवठ्यात व्यत्यय झाल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. नगरसेवक राजू गुंदेशा व संतोष सांगावकर यांनी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta