Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर

संकेश्वरात देवरदेवांग दासीमयन्नावर जयंती उत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वर श्री बनशंकरी देवालयात कोष्टी (देवांग) समाजातर्फे देवरदेवांग दासीमयन्नावर यांची 1043 वी जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वर नेकार हटकर समाजाचे अध्यक्ष दुंडेश शिडल्याळी यांनी देवरदेवांग दासीमयन्नावर प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बोलताना समाजाचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब हेदुरशेट्टी म्हणाले आद्य वचनकार, नेकार संत देवरदेवांग दासीमयन्नावर यांची जयंती …

Read More »

संकेश्वरात श्री रेणुकादेवी आंबील कार्यक्रम भक्तीमय वातावरणात

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील सौ. लक्ष्मीबाई बाबू कासारकर यांच्या निवासस्थानी श्री रेणुकादेवी (आंबील) महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सुभाष कासारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन देवीची पूजा करून महाप्रसादाचे पूजन केले. श्रींच्या हस्ते प्रसाद पूजनानंतर महाप्रसाद वाटप …

Read More »

संकेश्वरात मंत्रीमहोदयांच्या कार्यक्रमाला “नो पब्लिसिटी”

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील साईनाथ चित्रपटगृहाजवळच्या ओढ्यावरील ब्रिज (पूल) निर्माण कार्याचा नारळ राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी फोडला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पूल निर्माण आणि तेथील २४ मिटर रस्ता रुंदीकरण कामासाठी ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंत्री उमेश कत्तीं संकेश्वरच्या सर्वांगिण …

Read More »

एल. के. खोत काॅलेजमध्ये सॅनिटरी पॅडची सोय : डॉ. स्मृती हावळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संघ संचलित एल. के. खोत वाणिज्य महाविद्यालयात सुपंथ मंचच्या वतीने सॅनिटरी पॅडची सोय करण्यात आल्याची माहिती डॉ. स्मृती हावळ यांनी दिली. स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुरेखा हावळ यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. मंदार हावळ यांनी सुपंथ मंचच्या वतीने एल. के. खोत काॅलेजला सॅनिटरी पॅड डिस्पेन्सरी बहाल …

Read More »

संकेश्वरात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन भक्तीमय वातावरणात साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ भक्तगणांकडून श्री स्वामी समर्थ प्रकटदिन भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री दुरदुंडीश्वर सभागृहात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ प्रतिमेचे पूजन, अभिषेक आरती करुन भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बोलताना संतोष मगदूम म्हणाले, गेली दोन …

Read More »

संकेश्वरात मूकपदयात्रा….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात धर्मवीर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शंभुप्रेमी यांच्यावतीने मूकपदयात्रेने काढण्यात आली. मठ गल्लीपासून प्रारंभ झालेली मूकपदयात्रा गांधी चौक, नेहरू रोड, संसुध्दी गल्ली, बाजार पेठ, जुना पी.बी. रोड, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज चौक, जगज्योति बसवेश्वर महाराज चौक ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान …

Read More »

संकेश्वरात मुलांचा गुढी पाडवा उत्साहात….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात सकाळी मराठी घरांमध्ये घराच्या गच्चीवर, घराबाहेर उंचच-उंच गुढी उभारून गुढी पाडवा सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये संकेश्वरातील छोटे मुले-मुली देखील कांही मागे पडली नाहीत. त्यांनी देखील आपल्या परीने गुढी उभारून गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणित केला. येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर जवळ किरण खटावकर यांच्या निवासस्थानी …

Read More »

संकेश्वर “एआयएमआर” विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी..

संकेश्वर (प्रतिनिधी) : सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन महोत्सवात संकेश्वर अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिके जिंकून घवघवीत यश संपादन केले. मिस. किरण पाटील हिने प्रकल्प प्रस्ताव लेखनात प्रथम पारितोषिक पटकाविले. मिस. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली पूजा माळी, शिवानी राठोड आणि कावेरी सुतार यांनी बिझनेस …

Read More »

संकेश्वरात “वॉकर्स वे”ची संजय नष्टी यांना श्रद्धांजली

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे धडाडी नगरसेवक लढवय्या नेते संजय दुंडापण्णा नष्टी यांच्या अकालीक निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन संकेश्वर वॉकर्स वे सदस्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना वॉकर्स वे फ्रेंडसचे किरण किंवडा म्हणाले संजय नष्टी हे संकेश्वरच्या सर्व २३ प्रभागाच्या विकासासाठी झटणारे धडाडीचे नगरसेवक होते. त्यांना सर्व प्रभागांची काळजी असायची संकेश्वर …

Read More »

संकेश्वरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय महामार्गावरील पर्वतराव पेट्रोल पंपनजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सदर व्यक्ती मृतावस्थेत नजरेला पडताच लोकांनी संकेश्वर पोलिसांना कळविले आहे. संकेश्वर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचा पंचनामा केला आहे. सदर अज्ञात मृत व्यक्तीचं वर्णन असे आहे. सदर व्यक्तीचं वय अंदाजे 55 असून …

Read More »