Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात इच्छापूर्ती श्री मारुती मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड, यशागोळ काॅलनीतील इच्छापूर्ती श्री मारुती मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा पवनपुत्राच्या जयंतीला भक्तीमय वातावरणात पार पाडण्यात आला. संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, चंद्रशेखर यशागोळ यांचे हस्ते नूतन श्री मारुती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पुरोहित संतोष जोशी यांनी मंदिराची वास्तूशांती केली. इच्छापूर्ती श्री मारुती मंदिर वास्तूशांती व उद्घाघाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बसवराज बस्तवाडी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, रोहण नेसरी, संतोष कमनुरी, शिवानंद कमते (सीए), श्रीशैल्य सुनदाळी, संजय हादीमनी, अशोक संसुध्दी, डॉ. रमेश दोडभंगी, ॲड.संतोष नेसरी, अनेक मान्यवर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळ्यानंतर शेकडो भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराचा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर यशागोळ, संपत यशागोळ, विश्वनाथ यशागोळ, साईप्रसाद यशागोळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *