निपाणी (वार्ता) : येथील शुभकार्य वधू-वर सूचक केंद्रातर्फे येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात राज्यव्यापी सकल मराठा समाज वधू- वर परिचय मेळावा पार पडला. त्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला. प्रारंभी दादासाहेब खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात …
Read More »हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सुधाताई माने तर उपाध्यक्षपदी मल्लाप्पा खोत यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत सदस्य आनंद शेंडे, …
Read More »अधिवेशनातील आंदोलनात सहभागी व्हा
राजू पोवार : रायबागमध्ये रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : यंदाच्या गळीत हंगामात अनेक कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. याउलट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश धुडकावून कारखाने सुरू केले आहेत. याशिवाय पूर परिस्थितीमुळे सोयाबीनसह इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची अजूनही अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, यासह विविध समस्या घेऊन ९ …
Read More »म. मं. ताराराणी कॉलेजचा कबड्डी संघ राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेसाठी जय्यत तयारीने रवाना!
खानापूर : कबड्डी हा मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांचा हुकुमी खेळ असून गेले अनेक दिवस येथील खेळाडू विद्यार्थीनी तालुक्यातील संघ संघटनानी ठेवलेल्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊन आपली कसब दाखवत पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरताना दिसत आहेत. वजनी गटात अव्वल दर्जाचे प्रदर्शन करणाऱ्या या महाविद्यालयातील या कबड्डी …
Read More »म. मं ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची समृद्धी पाटील इंग्लिश निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम!
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या नामांकित पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले होते आता बैलहोंगलमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेतही विशेष यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2024-25 शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा बैलहोंगल या ठिकाणी …
Read More »“चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज”च्या गुऱ्हाळाचे थाटात उद्घाटन
खानापूर : नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना देखील शेतीकडे वळून त्यातून उद्योग निर्मिती करण्याचे धाडस खानापूर शहरातील नवउद्योजिका सौ. स्मितल प्रदीप पाटील, विशाल चौगुले यांचे धाडस कौतुकास्पद आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय सुरू करावे जेणेकरून खानापूरसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, त्यासाठी …
Read More »संकेश्वर : प्रभाग 21 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
संकेश्वर : प्रभाग 21 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दिवंगत आप्पाजी मर्डी यांच्या निधन झालेल्या रिक्त जागेसाठी भारती मर्डी काँग्रेस व गंगाराम भुसगोळ अपक्ष असे रिंगणात उभे राहिले आहेत. गत चार दिवसांपासून दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. शनिवार 23 रोजी मतदान, मंगळवार दि.26 रोजी निकाल जाहीर …
Read More »‘वक्फ’ला विवाह प्रमाणपत्र देण्याच्या आदेशाला स्थगिती : उच्च न्यायालयाचा आदेश
बंगळूर : कर्नाटक राज्य वक्फ मंडळाला मुस्लिम अर्जदारांना विवाह प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारी आदेशास, अंतरिम आदेशात, कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी सात जानेवारी २०२५ पर्यंत स्थगिती दिली. एका जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. अरविंद यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. “सशक्त प्रथमदर्शनी प्रकरण …
Read More »घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर हत्तीचे दर्शन
खानापूर : खानापूर तालुक्यातील घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर नागरिकांना हत्तीचे दर्शन झाले असून थोड्या वेळानंतर हत्ती रस्ता ओलांडून रस्ते शेजारी असलेल्या जाधव यांच्या शेतात शिरला. त्यावेळी शेतात भात कापणीचे काम सुरू होते. हत्तीला पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या व शेतात काम करत असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी ताबडतोब याची माहिती घोटगाळी …
Read More »शिक्षण मंत्र्यांनाच येत नाही कन्नड
विद्यार्थ्याच्या शेऱ्यांने मंत्री झाले संतप्त; कारवाईचा दिला आदेश बंगळूर : व्हिडिओ कॉन्फरन्स संभाषणात शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची खिल्ली उडवणारा विद्यार्थी व्हायरल झाला आहे. संभाषणात विद्यार्थ्याने सांगितले की, शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांना कन्नड भाषा येत नाही. वादाचे कारण म्हणजे हे ऐकून संतापलेल्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली. बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta