Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ

  खानापूर : मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ गावकऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक वतनदार वासुदेव पाटील हे होते. सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. गावकर्‍यांनी मंदिर उभारणीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. …

Read More »

संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक २१ पोटनिवडणूकीसाठी आज ४ उमेदवारी अर्ज दाखल

  संकेश्वर : येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये पोटनिवडणुक होणार असल्याने तीन इच्छुकांनी एकूण चार उमेदवारी अर्ज शुक्रवारी पालिका कार्यालयात निवडणूक अधिकारी ए. एच. जमखंडी यांच्याकडे दाखल केले. काँग्रेस नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज करण्यात श्रीमती भारती जितेंद्र मर्डी …

Read More »

केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : राज्यात सर्वत्र काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असून पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधी व संसदीय कार्यमंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. ते आज बेळगावात माध्यमांशी बोलत होते. केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली शिग्गावी पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यात आला असून, काँग्रेसचा विजय निश्चित आहे. भाजप वक्फसह अनेक …

Read More »

मानसिक आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक

  रुपाली निलाखे; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांकडून असंख्य आव्हानांना सामोरे जाताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत असून त्याबाबत विद्यार्थी व पालक यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत सुरत येथील प्रसिद्ध मनसोपचार तज्ञ रूपाली निलाखे यांनी व्यक्त केले. रयत …

Read More »

गुंफण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. रंगनाथ पठारे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने …

Read More »

संकेश्वर नगरपालिका प्रभाग क्रमांक 21ची पोटनिवडणूक रंगणार

  संकेश्वर : नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मधील नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे सदर निवडणूक चुरशीची होणार. 23 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीसाठी ॲड. विक्रम करणिग, माजी नगरसेवक गंगाराम भुसगोळ, रवींद्र कांबळे व स्वर्गीय नगरसेवक जितेंद्र मर्डी यांच्या …

Read More »

सरकारी कार्यालये, परिसरात धुम्रपान बंदी

  राज्य सरकारचा आदेश जारी बंगळूर : राज्य सरकारने गुरुवारी सरकारी कार्यालये आणि कार्यालय परिसरात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालणारा आदेश जारी केला. धूम्रपान आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हानीकारक असून सार्वजनिक ठिकाणी अशा उत्पादनांच्या सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. कर्नाटक राज्य …

Read More »

वक्फ मिळकत वाद : संयुक्त संसदीय समितीने स्वीकारला अहवाल

  भाजपने सादर केले निवेदन बंगळूर : वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) आज राज्यात आगमन झाले आणि वक्फ वाद उद्भवलेल्या जिल्ह्यांचा दौरा करून अहवाल प्राप्त केला. राज्यात वक्फ वाद चव्हाट्यावर आला असून, विजापूर, बागलकोट, हावेरी, मंड्या, धारवाडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या …

Read More »

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील बहुजन समाजाच्या मुलींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरवण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालिन अध्यक्ष मान. कै श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीतून व स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय 1992-93 साली स्थापन झाले. सन …

Read More »

निपाणीत विमान आणून नगरपालिकेवर नाहक बोजा

  माजी आमदार काकासाहेब पाटील; विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बसविण्यात आलेल्या लढाऊ विमानासंदर्भातील लढाई तीव्र होत चालली आहे. याठिकाणी विमान वाहतुक आणि स्थापित करण्याची तपशीलवार माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. सदर विमान निपाणीत आणण्याचा प्रकार म्हणजे, नालेसाठी घोडे खरीदण्याच प्रकार …

Read More »