माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर : निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : शहराच्या लकडी पुलापासून सुमारे १०० एकर जागेत नव्या तलाव निर्मितीचा प्रस्ताव आहे. यासाठी १७५ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा प्रस्ताव पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »चैत्यभूमी ही मानवी मूल्यांची क्रांती भूमी आहे : प्रबोधनकार मिथुन मधाळे
निपाणी : दादरच्या चैत्यभूमीवरील जनसमुदाय पाहता मानवी जीवन मूल्याची प्रेरणा मिळण्याची स्थान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी होय, असे प्रतिपादन आडी येथील तक्षशील बुद्ध विहारांमध्ये आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानात मिथुन मधाळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रत्नाप्पा वराळे …
Read More »उसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळालाच पाहिजे
राजू पोवार : विधानसभेला घरावर घालण्यासाठी मोर्चा रवाना निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला कारखाने आणि सरकारने प्रतिटन ५५०० रुपये दिले पाहिजेत. याशिवाय यापूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गतवर्षीच्या ऊसाला १५० रुपये प्रतिटन दिले पाहिजे. शिवाय महापूर आणि अतिवृष्टी काळात झालेल्या पिकांचा निपक्षपतीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी …
Read More »ऊस दरासाठी विधानसभेवर मोर्चा
राजू पोवार; सुळगावमध्ये जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : ऊस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा,या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा …
Read More »शेतकऱ्यांना सात तास थ्री फेज वीज पुरवठा
विधानपरिषदेत वीज टंचाईवरील प्रश्नाला उत्तर बंगळूर : दुष्काळात होरपळत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना सात तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, असे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले. सोमवारपासून बेळगावात सुरू झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत भाजपचे सदस्य चलवादी नारायणस्वामी यांच्या प्रश्नाला ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज …
Read More »रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे
डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी : ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात विविध आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. शिवाय अपघातांची संख्याही वाढली आहे. अशावेळी रुग्णांना रक्त अपुरे पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन महात्मा बसवेश्वर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी केले. येथील महात्मा …
Read More »मावळा ग्रुपची यंदाची मोहीम शिवेनरी गडावर
अध्यक्ष आकाश माने; निपाणी येथे बैठक निपाणी (वार्ता) : प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातील शिवप्रेमींना गडकोट मोहीम घडवणाऱ्या मावळा ग्रुपची यंदाची मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर होणार आहे. या मोहिमेची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी सांगितले. मावळा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक …
Read More »हिंदू खाटीक जातीचा अनुसूचित जातीत समावेश करावा
प्रा. राजन चिकोडे यांचे निवेदन; अधिवेशनात ठरावाची मागणी निपाणी (वार्ता) : भारतीय राजघटना अनुरूप २६ जून १९५६ रोजी भारत सरकारने हिंदू खाटीक जातीला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश काढला. त्यानुसार देशातील १५ राज्यानी हिंदू खाटीक जातीला अनुसूचित जातीचा दर्जा देऊन त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात प्रगती करण्याची संधी दिली. …
Read More »शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेवर मोर्चा
राजू पोवार; शेंडूर येथे जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : गतवर्षीच्या ऊसाला प्रति टन १५० रुपये द्यावे. यंदाच्या हंगामात उसाला कारखान्यांनी ३५०० रुपये व सरकारने २ हजार रुपये द्यावे, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे जनजागृती केली जात आहे. निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (ता. ७) विधानसौधला घेराओ घालण्यात …
Read More »बेळगावात आजपासून हिवाळी अधिवेशन
बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सोमवार दि. ४ पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जोरदार खडाजंगी रंगण्याची चिन्हे आहेत. पाच राज्यांतील निकालाचेही पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच राज्यांच्या निकालात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. परिणामी भाजपकडून …
Read More »