Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

जांबोटीत “स्वरांजली” सुगमसंगीत मैफलीला रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद

  जांबोटी : कला-संस्कृती प्रतिष्ठान जांबोटी यांच्यावतीने रविवारी बेळगावचे प्रसिध्द गायक विनायक मोरे, मंजुश्री खोत, अक्षता मोरे, चैत्रा अध्यापक व स्वरा मोरे यांच्या “स्वरांजली” मराठी सुगमसंगीत कार्यक्रमाला उपस्थित रसिकश्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. तीन तास रंगलेल्या या संगीत मैफलीत विविधढंगी बहारदार भावगीते, भक्तीगीते, अभंग, नाट्यगीते प्रस्तुत करून त्यांनी उपस्थित रसिकांची मने …

Read More »

कर्नाटक राज्यात पतंगाच्या मांज्यावर बंदी

  बंगळूर : पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मांजा दोऱ्या’बाबत कर्नाटक सरकारने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्राणीप्रेमींच्या सूचना लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने मानव, पक्षी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी धातू किंवा काचेच्या लेप असलेल्या तारा किंवा मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी करण्यात आला आहे. पूर्वी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा : चंद्रकांत देसाई

  खानापूर : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा असतो तसेच विद्यार्थ्यांचा पाया प्राथमिक शाळांमध्ये घट्ट होतो त्यामुळे पुढे विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन यशस्वी होतात, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे. हलशीवाडी येथिल दत्तात्रय देसाई याना शिक्षण खात्याचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबाबत …

Read More »

गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली

  कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची १८ गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची ३४ रेडके बेकायदेशीररीत्या टेम्पो गोठ्यात ठेवली आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली. यावेळी सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने या वासरांची …

Read More »

बिबट्याच्या हल्ल्यात बकरी, कुत्री भक्षस्थानी!

  खानापूर : पंधरा दिवसांपूर्वी चापगाव हडलगा रस्त्यावर सदर बिबट्या दिसून आला होता. सदर बिबट्याच्या भक्ष्यस्थानी कुत्री व बकरी पडत आहेत. काही लोकांची बकरी नाहीशी झाल्याचे निदर्शनाला आले. मात्र प्रत्यक्षात खैरवाड डोंगरी जवळ हडलगा येथील एका शेतकऱ्याचा एक चांगला ठगर व बकरी ठार झाल्याची बाब निदर्शनाला आली. काही बकरी जखमी …

Read More »

शिवापुरवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागून ६ एकरातील ऊसाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : ऊसाच्या शेतामध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे घर्षण होऊन शिवापुर वाडी येथील ऊसाला आग लागली. त्यामध्ये सहा एकरातील ऊस जळून खाक झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्कता दाखवून पुढील काही सयामधील ऊस तोडून टाकल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवापूरवाडी येथे जोमा, कुरणे, बन्ने, चव्हाण, खोत यांच्यासह …

Read More »

खानापूर : प्रकाश पाटील आत्महत्या प्रकरणी सहा अटकेत, एक फरार

  खानापूर : लक्केबैल येथील प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोसायटीच्या आजी, माजी संचालकासह गावातील तिघेजण अशा सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार सहा जणांना अटक करण्यात आल असून एक जण …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात नंदगड विभागात खानापूर म. ए. समितीची जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …

Read More »

लक्केबैल कृषी पतीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पाटील यांची आत्महत्या

  खानापूर : लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील (वय 48) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती अशी की, लोकोळी येथील रहिवासी असलेले प्रकाश पांडुरंग पाटील, हे लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीत बऱ्याच वर्षापासून सचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जांबोटी विभागात जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …

Read More »