निपाणी (वार्ता) : नवीन आर्थिक वर्षाला एक एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेध्ये मालमत्ता कर (घरफाळा) पाणी पट्टी ३० एप्रिल पर्यंत करा मध्ये ५ टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय थकबाकी वसुलीची मोहीम राबवली जात आहे. मालमत्ता कर वेळेत …
Read More »दहावीमध्ये राज्यात दुसरा आलेल्या झुंजवाड येथील दिव्या देसाईचा शिवस्वराज संघटनेतर्फे सत्कार
खानापूर : राज्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणे ही खानापूर तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असून दिव्या देसाई हिने पुढील शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत चांगली कामगिरी करावी असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तसेच शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी केले आहे. दहावी परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेल्या …
Read More »बोरगावमध्ये विद्युत खांब वाहिन्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
वादळी वाऱ्यामुळे वीज खांबांचे मोठे नुकसान; ५० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण निपाणी (वार्ता) : चार दिवसांपूर्वी बोरगाव परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे बोरगावसह परिसरातील वाडी-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळून जमीनदोस्त झाल्या असून विज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अंधारात …
Read More »मॉन्सूनपूर्व खरीपाच्या कामांना वेग
मृग नक्षत्र ४० दिवसांवर; अक्षय तृतीया पासून लगबग निपाणी (वार्ता) : अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयापासून प्रत्यक्ष खरिपाच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. मृग नक्षत्र ४० दिवसांवर येऊन ठेपले आहे. ग्रामीण भागात शेतकरी पारंपारिक पद्धतीने बैल जोड्या सह ट्रॅक्टर द्वारे मशागतीची कामे सुरू केली आहेत. …
Read More »उन्हाच्या चटक्यात शेकडो प्रवासी बस स्थानकावर
सुट्या, लग्नसराईमुळे प्रवाशांची गर्दी निपाणी (वार्ता) : उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईमुळे येथील बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. रविवारी (ता. २६) तापमान ४३ अंशांवर गेले असताना अक्षरशः चटके सोसत प्रवासी आपल्या बसची प्रतीक्षा करताना दिसून आले. त्यामध्ये विशेषतः महिला वृद्ध नागरिकांनी लहान मुलांना त्रास होत आहे. रविवारी उन्हाने विक्रम करीत …
Read More »गर्लगुंजी माऊली देवी यात्रा काळात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
विद्यार्थी व कामगारांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा खानापूर : गर्लगुंजी येथील श्री माऊली देवी यात्रा काळात तसेच यात्रेनंतरही बेळगाव–गर्लगुंजी आणि खानापूर–गर्लगुंजी या मार्गांवरील बसफेऱ्या वाढवाव्यात व सुरू असलेल्या बससेवा सुरळीत ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर बेळगाव–गर्लगुंजी व खानापूर–गर्लगुंजी मार्गांवर बससेवेमध्ये अनियमितता निर्माण …
Read More »ध्येय, परिश्रम, जिद्दीमुळे विद्यार्थ्यांचे यश
अण्णासाहेब हवले; गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यासागर संस्थेच्यावतीने सत्कार निपाणी (वार्ता) : वर्षभर निरंतरपणे अभ्यास केल्याने यश मिळते हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. ध्येय चिकाटी ठेवून अभ्यास केल्यास निश्चितच आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी निरंतर पाणी अभ्यास करून परीक्षेत चांगले यश मिळवावे. त्यामुळे समाज गाव आणि शिक्षण संस्थेचे …
Read More »ई-केवायसी करण्यासाठी ज्येष्ठांना त्रास; गॅस सिलिंडरसाठी निपाणीत वाढला संघर्ष
निपाणी (वार्ता) : घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या सूचनांवर आधारित अंमलबजावणी होत असल्याने विशेष करुन ज्येष्ठांची गैरसोय अधिकच वाढली आहे. गॅस सिलिंडर एजन्सींमध्ये सिलिंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रथम ई-केवायसी पूर्ण करण्याचे सांगितले जात आहे. कागदपत्रांची पूर्तता, …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी राजा शिव छत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक 11 वाजता बोलवण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »गणेश मंडळ देसाईवाडा (तिओली) ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान
खानापूर : शुक्रवार दिनांक 24 रोजी तिओली (देसाई वाडा) येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गणेश मंडळ देसाईवाडा आणि ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सरचिटणीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta