निपाणी (वार्ता) : निपाणी येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स आणि महात्मा गांधी रुग्णालय यांच्या संयुक्त सहकार्याने कामगार दिनानिमित्त बांधकाम क्षेत्रातील कामगार व कंत्राटदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. व्हनशेट्टी पार्कमधील बी. आर. पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात १५० कामगार, कंत्राटदारांची तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. …
Read More »मुस्लिम समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील
सहकाररत्न उत्तम पाटील ; मुस्लिम समाजातर्फे सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सध्या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून राजकारण सुरू आहे. त्यामुळे समाजासह गावांचा विकास खुंटला आहे. अशा गोष्टींना फाटा देऊन सर्व समाजाच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित घेऊन शहराचा विकास सुरू आहे. या पुढील काळातही नागरिकांनी सहकार्य करून गावचा विकास साधावा, …
Read More »उन्हाच्या तडाख्यामुळे दूध उत्पादनात घट
चारा टंचाईसह पशुखाद्य दरवाढीचा फटका निपाणी (वार्ता) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुधाळ जनावरांना मोठा फटका बसत असून दुग्ध उत्पादनातही लक्षणीय घट होत असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरे चारा कमी खात असल्याने तसेच उष्णतेमुळे त्यांच्या अंगाची लाही लाही होत असल्याने दुधावर थेट परिणाम होत आहे. …
Read More »खगोलशास्त्रीय घटनेमुळे सावली होणार गायब
५ मे रोजी निपाणी परिसरात शून्य सावली दिवस ; एस. एस. चौगुले यांची माहिती निपाणी (वार्ता) : पृथ्वीवर अनेक खगोलीय घटना सतत घडतात. हवामानातील बदलांमुळे कांही पाहता येतात तर कांही पाहता येत नाहीत. अशा घटनापैकी या महिन्यांत शून्य सावलीचे दिवस हा मजेशीर अनुभव घेता येणार आहे. खगोलशास्त्रीय भाषेत त्याला …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांचा 67 वा वाढदिवस शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाला. श्री. गोपाळ देसाई यांचे बालपण कष्टात गेले. इच्छा असून देखील घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर भारतीय सैन्य दलात दाखल होऊन गोपाळ देसाई यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून …
Read More »“बापू गेले…”; अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी व्यक्त केल्या भावना
मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर राहिलं तर शहाणं होणार नाही म्हणून हेमंतला कोल्हापूरात ठेवला पाहिजे! जीजी बापूनं ह्रदयावर दगड ठेवला अन् नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकलेल्या आपल्या पहिल्या अपत्याला आपल्या बहिणीकडं मला सोडलं. का तर याच मोठ्या बहिणीनं बापूंना ही शिकवून शहाणं …
Read More »निपाणी शिक्षक संघ निवडणूकीत चुरशीने मतदान होऊन गुरुसेवा पॅनेलचा विजय
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक संघ निपाणी तालुका संघटनेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता.१) चुरशीने पार पडली. गुरुसेवा पॅनेलने ४ बिनविरोध महिला उमेदवारांसह सर्व ८ जागांवर विजय मिळवला तर विरोधी शिक्षक सेवा पॅनेल पराभुत झाले. यामध्ये दिवसभरात ५६३ पैकी ५०८ शिक्षकांनी मतदान केले. ९०% मतदान झाले. …
Read More »वाढत्या उन्हामुळे टोमॅटो पिकाला फटका
दरही नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत निपाणी (वार्ता) : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केली असली, तरी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे या पिकाला मोठा फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पादन घटल्याने आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय …
Read More »बोरगांववाडी सिद्धिविनायक गणेश मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगाववाडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम निडसोशी येथील दूरदुंडेश्वरमठाचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सहकारत्न उत्तम पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. उत्तम पाटील यांनी, देव हा सर्वत्र …
Read More »बस स्थानकात पडलेले खड्डे बुजवल्याने चालक, वाहकासह प्रवाशातून समाधान
निपाणी (वार्ता) : तालुक्याचे ठिकाण असलेल्या निपाणी येथील बसस्थानक आवारातील विविध फलाटांवर पडलेले खड्डे अखेर आगार प्रशासनाने बुजवले आहेत. अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या समस्येमुळे बस चालकांसह प्रवासी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बसस्थानक परिसरात अस्वच्छतेचेही साम्राज्य पसरले होते. पंचहमी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आगाराने याची दखल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta