Friday , November 6 2026
Breaking News

खानापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; म्हैस चोरी करणारी टोळी जेरबंद!

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील ओलमनी येथील शेतकरी मारुती पवार यांच्या शेतातील गोठ्यातून दोन म्हशी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा खानापूर पोलिसांनी अवघ्या दोन ते तीन दिवसांत छडा लावल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईबद्दल खानापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मारुती पवार यांच्या गोठ्यातून रात्रीच्या वेळी दोन म्हशी चोरीला गेल्यानंतर याबाबत तातडीने खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. तसेच संशयितांची नावे आणि त्यांचे फोन क्रमांकही पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील संशयितांना पकडल्याचे सांगण्यात येत आहे. या चोरीमध्ये चार ते पाच जणांची टोळी सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे.

चोरीला गेलेल्या दोन्ही म्हशी सौंदत्ती परिसरात ठेवल्याचे समजते. त्या म्हशी परत आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती मारुती पवार आणि दीपक कवठणकर यांनी दिली.

खानापूर पोलिसांनी तत्परतेने तपास करून केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. चांगले काम करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच चुकीच्या कामावर टीका करणेही आवश्यक आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक खबऱ्याचा शोध घेणार का?

दरम्यान, चोरी करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली असली, तरी या टोळीला स्थानिक पातळीवर माहिती पुरवणारा खबरी कोण, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील परिस्थिती, शेतातील गोठे आणि पशुधनाची माहिती चोरट्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खानापूर पोलिसांच्या कारवाईबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *