Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

दहावी परीक्षेचा आज निकाल; तृतीय भाषेला यंदा गुण मिळणार

  बंगळूर : अनेक गोंधळांच्या पार्श्वभूमीवर लाखो विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल उद्या (ता. २३) जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी बुधवारी दिली. उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर विभागाच्या अधिकृत …

Read More »

आई आणि मुलाचा संकेश्वरजवळील हिरण्यकेशी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

  संकेश्वर : आई आणि मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीत मंगळवार दि. 21 एप्रिल रोजी दुपारी घडली असून मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सापडला नसून शोधकार्य सुरू आहे. याबाबत नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमाननगर येथील सौ. लक्ष्मी कुटोळी …

Read More »

गाऊन घालण्याच्या वादातून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न: पतीला अटक

  खानापूर : गाऊन घालण्यावरून झालेल्या वादातून पत्नीला पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नंदगड पोलिसांनी अटक केली आहे. खानापूर तालुक्यातील करजगी गावच्या रहिवासी श्रीमती संतोषी नारायण भातखांडे (55) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 19 एप्रिल रोजी रात्री बेळगावच्या बिम्स रुग्णालयात जाऊन तक्रार दिली, त्यानंतर नंदगड पोलीस …

Read More »

लग्न समारंभ, वास्तुशांतीमुळे फुलांच्या दरात तेजी

  मोगरा १००० रुपये किलो : गजऱ्याचे दरही दुप्पट निपाणी (वार्ता) : अक्षय तृतीयेपासून विवाह सोहळ्यांना प्रारंभ झाला आहे. पुढील काही दिवस आणखीन मुहूर्त असल्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत वाढ झाली आहे. लग्न समारंभात महिलांची विशेष पसंती असलेल्या गजऱ्यासाठी लागणाऱ्या एक किलो मोगऱ्याचा दर १००० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय …

Read More »

गॅस दरवाढीने चुलीवरच्या जेवणाला ‘अच्छे दिन’

  सर्वत्र सिलिंडरचा तुटवडा; ‘त्या’ हॉटेलकडे वळले खवय्ये निपाणी (वार्ता) : इराण-इस्त्राईल युध्दजन्य परिस्थिती सुरू आहे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आर-पारची लढाई सुरू केली आहे. या युध्दाची झळ सगळ्यांनाच बसू लागली आहे. ही झळ स्वयंपाक घरापर्यंत आली आहे. शहरासह ग्रामीण भागात सिलिंडरची टंचाई झाली आहे. खेड्या पाड्यात …

Read More »

भर उन्हातील जनगणनेमुळे शिक्षक अडचणीत

  उन्हाळी सुट्टीवर गदा ; मधुमेह, रक्तदाबाच्या शिक्षकांनाही ड्युटी निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांच्या परीक्षांपासून निकालांपर्यंत शिक्षकांना विविध कामे करावी लागतात. एप्रिल महिन्यात कामांचे प्रमाण वाढते. शिक्षण विभागाकडूनया कामांचा ताण वाढत असून त्यातच विविध प्रशासकीय कामांची भर पडत आहे. एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या या दबावामुळे शिक्षकांवर मानसिक ताण निर्माण झाला …

Read More »

वाळकी यात्रेत दानोळीच्या बंडा शिंदे यांची बैलगाडी प्रथम

  बंडा खिलारे ठरले द्वितीय मानकरी; भर उन्हात शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : वाळकी येथील श्री मरगुबाई देवाची यात्रा मंगळवार (ता.२१) आणि बुधवारी (ता.२२) पार पडली. त्यानिमित्त प्रथमच शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये दानोळीच्या बंडा शिंदे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवून प्रथम क्रमांकाचे ३५ हजार ५५५ …

Read More »

श्री नागेश महारुद्र मंदिर कळस शोभायात्रा भक्तिमय वातावरणात

  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री नागेश महारुद्र मंदिराच्या कळसाची भव्य शोभायात्रा सोमवार, दि. २० एप्रिल रोजी मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. परिसरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कळस व देवमूर्तींचे दर्शन घेतले. देसाई गल्लीतील निरंजन सरदेसाई यांच्या …

Read More »

एलपीजी गॅस दरवाढीने रिक्षाची चाके थबकली

  रिक्षा व्यवसायिक अडचणीत; दरवाढ मागे घेण्याची मागणी निपाणी (वार्ता) : घरगुती वापराच्या सिलिंडर पाठोपाठ रिक्षांसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. ५५ रुपये प्रतिकिलो मिळणारा गॅस थेट १२० रुपयांवर पोहोचल्याने रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास रिक्षाचालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती शहरातील रिक्षा …

Read More »

निपाणीत अवतरली अवघी शिवसृष्टी

  सजीव देखाव्यामुळे फिटले डोळ्याचे पारणे; मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे नेत्रदीपक मिरवणूक निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त नेत्र दीपक मिरवणूक काढण्यात आली. निवडणुकीतील सजीव देखाव्यामुळे शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर, भगवा परिसर, आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शहरात शिवसृष्टी अवतरण्याचे चित्र दिसून आले. …

Read More »