कारखाने सुरू करू देणार नाही : राजू पोवार यांचा कारखानदारासह सरकारला इशारा निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, महापुर, विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस पिक घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. खर्चाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा कर्नाटक राज्य …
Read More »इटगी स्कूल दाखला प्रकरण : संस्था चालकांनी आडमुठी भूमिका घेऊ नये : खानापूर ब्लॉक काँग्रेस
खानापूर : आज पहाटे ४.३० वाजता बीईओ ऑफीसमध्ये सुरू असलेले इटगी विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते कायदेशीर बाबींमुळे स्थगित करण्यात आले आहे. शेवटी आज पहाटे ४.३० वाजता पालक व सरकारी अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा होऊन इटगी विद्यार्थ्य्यांचे आंदोलन तात्पुरते २-३ दिवसांसाठी स्थगित केले आहे. डीडीपीआय यांनी पहाटे ४ वाजता व्हीडीओ द्वारे …
Read More »इटगी शाळा दाखला प्रकरण : दाखले मिळाल्याशिवाय बीईओ ऑफिस सोडणार नाही; विद्यार्थी व पालकांचा ठाम निर्धार
खानापूर : इटगी येथील राणी चन्नम्मा शाळेच्या विद्यार्थ्यांचे दाखले न दिल्याच्या प्रकरणाने अखेर प्रशासन हादरले असून, गुरुवारी मध्यरात्री खानापूर शिक्षण विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी बीईओ कार्यालयात ठिय्या धरत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रात्री 1.30 वाजता जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) स्वतः खानापूर येथे दाखल झाल्या, तर रात्री …
Read More »खानापूर तालुक्यात शुक्रवारी वीजपुरवठा खंडित
खानापूर : हेस्कॉमकडून वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे. खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, …
Read More »संघासह सर्व संघटनांच्या उपक्रमांवरील सरकारी निर्बंधांना स्थगिती
कर्नाटक सरकारला धक्का; संविधानिक अधिकार हिरावता येत नसल्याचा न्यायालयाचा इशारा बंगळूर : सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणी कोणत्याही संघटनेच्या उपक्रमांसाठी पोलिस विभागाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य ठरविणाऱ्या राज्य सरकारच्या आदेशाला धारवाड खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आरएसएसच्या उपक्रमांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना …
Read More »१ नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर समितीच्या वतीने नंदगड भागात जनजागृती
खानापूर : एक नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या ६८ वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले …
Read More »निळ्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार कॉन्स्टेबल; आजपासून राज्य पोलिसांचा नवा लूक
पारंपारिक स्लॉच हॅटला निरोप बंगळूर : कर्नाटक पोलिस दलाचा गणवेश आजपासून अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसणार आहे. पारंपारिक ‘स्लॉच हॅट’ला निरोप देत, राज्यातील पोलिस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आता निळ्या रंगाच्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार आहेत. हा ऐतिहासिक बदल मंगळवारी विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात झाला. या समारंभात मुख्यमंत्री …
Read More »नेत्र शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदवी मिळविल्याने डॉ. प्रियांका जासूद यांचा निपाणीत सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांची कन्या डॉ.प्रियांका सागर पाटील यांनी नेत्र शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदवी प्राप्त केली आहे. शिवाय अपघातातील मृत व्यक्तीच्या नेत्राचे दुसऱ्या व्यक्तीला यशस्वीरीत्या प्रत्यार्पण केले. या अवघड शस्त्रक्रियेमुळे त्यांचा येथील माजी नगरसेवक संघटनेतर्फे माजी नगराध्यक्ष विजय शेटके, प्रवीण भाटले सडोलकर यांच्या हस्ते …
Read More »संगोळी रायण्णा पुतळा उभारणीत सर्वधर्मीयांचे योगदान महत्त्वाचे
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे : विविध समाजातील प्रमुखांची बैठक निपाणी (वार्ता) : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कलचे सुशोभीकरण करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३.२५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. चबुत-यावर पुतळा …
Read More »काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती
जांबोटी : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या 68 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta