Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

गांधीजींच्या प्रेरणेतून राष्ट्र उभारणी व्हावी

  प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत विविध ठिकाणी गांधी जयंती निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी नैतिकतेतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. हे स्वातंत्र्य आबाधीत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अहिंसा मार्गाने त्यांनी इंग्रजांना हाकलून देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या कार्याचे स्मरण होण्यासह प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीचे काम व्हावे, असे मत प्रा. …

Read More »

खानापूर तालुक्यातील मौजे मोदेकोप येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

  खानापूर : अखिल भारतीय कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर व सरकारी हॉस्पिटल खानापूर आणि मौजे मोदेकोप यांच्या संयोजनातून सदरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विश्व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 01 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शिबिर सरकारी मराठी शाळा मोदेकोप येथे उद्घाटनाचा कार्यक्रम मोदेकोप गावचे …

Read More »

नेशन बिल्डर अवार्डने एस. एस. हजारे सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता.निपाणी) येथील रहिवासी आणि पन्हाळा तालुक्यातील सावर्डे (सातवे) भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरी क्लब रॉयल्स तर्फे ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात आले. हजारे यांनी आतापर्यंत ज्ञानदानासह विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यान दिली आहेत. …

Read More »

जगामध्ये जैन धर्म पवित्र!

  आमदार शशिकला जोल्ले; बोरगावमध्ये १०८ रथोत्सव कार्यक्रम निपाणी (वार्ता) : ‘जगा आणि जगू द्या’असा संदेश जैन धर्माने दिला आहे. त्यामुळे जैन धर्म पवित्र असून अहिंसा मार्गाने जीवन जगण्याचा सल्ला त्यागी मुनींनी दिला आहे. श्री क्षेत्र सम्मेद शिखरजी येथे कर्नाटक भवनासाठी मंत्री असताना प्रयत्न केले आहेत. लवकरच मुख्यमंत्री व संबंधित …

Read More »

इस्लाम हा आदर्श जीवनचा संदेश देणारा धर्म

  सय्यद निजामुद्दीन बुखारी; निपाणीत ईद ए- मिलाद निपाणी (वार्ता) : कोणतेही काम करताना चांगले भावना ठेवून केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. धर्म हा माणसापेक्षा मोठा असून प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे. इस्लाम हा आदर्श जीवन मार्गाचा संदेश देणारा असून त्याचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन सय्यद निजामुद्दीन बुखारी यांनी केले. …

Read More »

‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत निपाणी शहरामध्ये स्वच्छता मोहीम

  निपाणी (वार्ता) : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ या उपक्रमाअंतर्गत शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेतर्फे ३१ वार्डमध्ये स्वच्छता राबविण्यात आली. शहर आणि उपनगरातील काही चौकामध्ये खराटा हातामध्ये घेत सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी – कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा प्रतिसाद लाभला. येथील नगरपालिकेच्या …

Read More »

कन्नड अभिनेत्याच्या कारची दाम्पत्याला धडक; रुग्णालयात नेताना महिलेचा मृत्यू, तर पती जखमी

  बेंगळुरू : कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने शनिवारी (दि.३०) बेंगळुरूमध्ये चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. बेंगळुरूमधील कुमारस्वामी वाहतूक पोलिस ठाण्यात या कन्नड अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेताना वेगात …

Read More »

भाजपशी युतीवर धजद प्रदेशाध्यक्षानीच व्यक्त केली नाराजी

  आपल्याशी चर्चा केली नसल्याची खंत; १६ ला घेणार अंतिम निर्णय बंगळूर : एच. डी. कुमारस्वामी हे माझ्यासाठी लहान भावासारखे आहेत. मात्र, त्यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट क्लेशजनक असल्याचे धजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी शनिवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की युतीच्या मुद्द्यावर धजदचे नेते भाजपकडे गेले हे …

Read More »

बँक खात्यातून दोन ग्राहकांची २१ हजाराची रोकड लंपास

  निपाणी (वार्ता) : ग्राहकांना कोणतीच माहिती नसताना दोघा ग्राहकांच्या खात्यातून २१ हजाराची रोकड लंपास झाल्याची घटना शनिवारी (ता.३०) घडली. याबाबत सायबर क्राईम विभागाकडे ग्राहकांनी तक्रार केली आहे. या घटनेमुळे बँक ग्राहकातून भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्राहकांनी सांगितलेली अधिक माहिती अशी, सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शिरगुप्पी येथील किरण …

Read More »

महात्मा गांधी जयंती निमित्त निपाणीत सोमवारी अभिवादन

  निपाणी (वार्ता) : येथील गांधी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळ्याजवळ सोमवारी (ता.२) ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता, विविध संघटनांच्या वतीने महात्मा गांधीजींना अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. अच्युत माने, प्रा. एन. आय. खोत, प्रशांत गुंडे, जयराम मिरजकर, सुधाकर माने, बाबासाहेब मगदूम, स्वाभिमानी शेतकरी …

Read More »