बेंगळुरू : चालू शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या परीक्षांचा निकाल गुरुवार दि. ९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटक शालेय शिक्षण आणि मूल्यमापन समितीने जाहीर केली आहे.
सकाळी १०.३० वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असून शासनाच्या https://karresults.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येऊ शकणार आहे. निकालासाठी शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या कळणार आहे.यंदा एकूण ८.६९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४.४१ लाख विद्यार्थी तर ४.२८ लाख विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. २५ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत २७५० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. उद्या शिक्षण विभागाच्यावतीने पत्रकार परिषद पार पडल्यानंतर ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.