बेळगाव वार्ताने सातत्याने “त्या” बँकेच्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराबद्दल लिखाण करून त्यांचे पितळ उघडे पडण्याचा प्रयत्न केल्यामुळे अखेर त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बेळगाव वार्ताने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबद्धल आणि त्यातील गैरकारभारबद्दल लिखाण केल्याने जागरूक सभासद व ग्राहकांनी अखेर त्या बँकेच्या अध्यक्षाला धारेवर धरले. पण हेकेखोर अध्यक्षाने आपला माजोर्डपणा काही कमी केला नाही. अखेर बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा धाक दाखविल्यावर बँकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यात देखील बँकेतील त्या माजी नगरसेवक व विद्यमान संचालकांनी अध्यक्षावर भडकल्याचे नाटक केले. शेवटी अध्यक्षाने थकीत पगार देवू केले पण शेवटी भ्रष्टाचाराची एवढी सवय लागलेला अध्यक्ष सुधारेल तरी कसा. त्यातही त्याने २५% दलाली खाल्ली. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारा दिग्गु भाई शेवटी आपल्या खऱ्या रंगात आलाच. आणि वरतून एवढं सगळं करून आपण किती धुतल्या तांदळासारखे आहोत हे दाखविले.
एकंदर या सर्व घडामोडीनंतर खासगीत आणि दडप्या आवाजात का असेना बेळगाव वार्ताचे मनापासून आभार मानले. निर्भिडपणे या सर्व बँकेचा गैरव्यवहार बाहेर काढला व कोणत्याही दबावाला न बळी पडता किंवा अमिषाला बळी न पडता या सर्व घटनेचा पर्दाफाश केला यासाठी बेळगाव वार्ताचे सर्वत्र कौतुक होत आहे.