बेळगाव : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपच्या स्थानिक नेत्याने एका मुस्लिम दाम्पत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मतदानादरम्यान झालेल्या गदारोळात एका मुस्लिम जोडप्याला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून भाजपचे नेते बाबासाहेब दोंडीराम शिंदे यांनी या दाम्पत्याला मतदान केंद्रातून खेचून आणून त्यांच्याच दूध डेअरीत प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.
भाजपचे नेते दादासाहेब शिंदे यांनी मोहम्मद दावल वज्रवडे आणि त्यांची पत्नी रमेजा मोहम्मद वज्रवडे यांना मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या मोहम्मद वज्रवडे यांच्यावर अथणी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मारहाण प्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात बाबासाहेब दोंडीराम शिंदे यांच्यासह आठ जणांविरुद्ध मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.