Monday , September 21 2026
Breaking News

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल बाहेर काढणाऱ्या भाजपा नेत्याविरोधातही लैंगिकछळाची तक्रार, पोलिसांनी घेतले ताब्यात

Spread the love

 

बेंगळुरू : जनता दल सेक्युलरने (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करणारे भाजपा नेते जी देवराजे गौडा यांना शुक्रवारी उशिरा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. ते बेंगळुरूहून चित्रदुर्गाकडे जात होते, त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितले.

एका ३६ वर्षीय महिलेने देवराजेविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. देवराजे यांनी तिची मालमत्ता विकण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. देवराजे गौडा यांच्यावर प्रज्वल रेवण्णा यांच्या अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ लीक केल्याचा आरोपही आहे. मात्र त्यांनी हे व्हिडिओ लीक केल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.
गौडा यांनी प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित लैंगिक शोषणाबद्दल गेल्या वर्षी भाजप नेतृत्वाला सावध केले होते आणि हसनमधील जेडी(एस) नेत्याला लोकसभेचे तिकीट देऊ नये असे पक्षाला सांगितले होते. गेल्या वर्षी जेडी(एस) सोबत युती करणाऱ्या भाजपाने मात्र हसनमधून प्रज्वल यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

हसन लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान झाल्याच्या एका दिवसानंतर हा लैंगिक घोटाळा समोर आला होता. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे व्हिडिओ फिरू लागले. प्रज्वल रेवण्णा काही व्हिडिओंमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत आहेत.

प्रज्वल रेवण्ण हे माजी पंतप्रधान आणि जेडी(एस) सुप्रीमो एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत, हे व्हिडिओ समोर आल्याच्या दिवशीच ते जर्मनीला रवाना झाले आणि नंतर त्यांना जेडी(एस)ने त्यांना निलंबित केले. इंटरपोलच्या सदस्य राष्ट्रांना एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यास मदत करण्यास सांगणारी ब्लू कॉर्नर नोटीस त्यांच्याविरुद्ध जारी करण्यात आली आहे.

त्यांच्यावर बलात्कार, विनयभंग, धमकावणे, ब्लॅकमेलिंग आरोपांसह तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे वडील एचडी रेवन्ना सध्या तीन मुलांची आई असलेल्या महिलेचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *