बेंगळुरू : कर्नाटक एसएसएलसी निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एसएसएलसी परीक्षेत 631204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यभरातून 76.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळी एसएसएलसी परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. एसएसएलसी परीक्षेच्या निकालात उडुपी जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यादगिरी शेवटच्या स्थानावर आहे.
यावेळी एसएसएलसी परीक्षेसाठी कर्नाटकमध्ये 8.69 लाख विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. यामध्ये 4.41 लाख मुले आणि 4.28 लाख मुली आहेत. तसेच, कर्नाटकातील 2,750 परीक्षा केंद्रांवर 18,225 खाजगी विद्यार्थी, 41,375 पुनरावृत्तीचे विद्यार्थी आणि 5,424 भिन्न दिव्यांग विद्यार्थी परिक्षेला बसले होते.
दहावीच्या निकालासाठी अधिकृत वेबसाइट
karresults.nic.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील SSLC निकाल 2024 लिंकवर क्लिक करा नवीन लॉगिन पृष्ठ उघडेल तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा त्यानंतर निकाल दिसेल.