Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

चापगांव ग्रामस्थांकडून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा

  खानापूर : चापगांव ता. खानापूर तालुक्यातील सकल मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सिमा भागातील खानापूर तालुक्यातील चापगांव समस्त मराठा बांधव एकत्रित येवून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले. “कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही, मनोज जरांगे तुम आगे …

Read More »

घरोघरी गंगा-गौरीची आकर्षक आरास

भाजी भाकरीसह पुरणपोळीचा : मंगळवारी होणार गंगा गौरीचे विसर्जन निपाणी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या उत्साहात गंगा-गौरीच्या आगमनाने धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच उजळले आहे. गणेशाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचे स्वागत करण्यात आले. परंपरेनुसार पहिल्या दिवशी वांगी, भेंडी, दोडका, दिंडका, गवार, शेपू अशा भाज्यांचा भाजी-भाकरीसह नैवेद्य दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१) …

Read More »

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे समारंभ उत्साहात संपन्न…

  खानापूर : श्रीदेव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे शुभारंभ शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी मणतुर्गे येथे गावचे सुपुत्र श्री. अविनाश नारायण पाटील, उद्योजक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. विजय प्रकाश पाटील निवृत्त लष्करी हवालदार होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत श्री. नामदेव गुंडु गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ …

Read More »

जांबोटी- चोर्ला मार्गावर वाहतूक ठप्प!

  खानापूर : बेळगाव – पणजी व्हाया चोर्ला मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दुसरी अवजड ओव्हरटेक करून जात असताना पलटी होऊन या मार्गावरील वाहतूक सोमवारी (आज दि. 1 सप्टेंबर) पहाटेपासून ठप्प झाली आहे. जांबोटी पासून काही अंतरावर कालमणी ते आमटे दरम्यान सदर वाहतूक ठप्प …

Read More »

दसरा क्रीडा, खुला गट महिला कबड्डी स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय प्रथम क्रमांकासह अव्वलस्थानी!

  खानापूर : कर्नाटकातील दसरा क्रीडा महोत्सवाला अन्यनं साधारण महत्त्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कर्नाटकातील खेळाडूंना खेळाचे भक्कम व्यासपीठ मिळते हे सर्वश्रुत आहे. येथील शांतीनिकेतन शाळेच्या क्रिडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे निकाल हाती आले असून कबड्डी खेळात महिला ओपन गटात मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील खेळाडूनी जलद …

Read More »

संकेश्वर निलगार गणपतीचे मुख्य सेवेकरी अशोक हेद्दूरशट्टी यांच्या निधनामुळे गणपतीचे दर्शन दोन दिवस बंद

  संकेश्वर : संकेश्वर शहरातील निलगार गणपती उत्सवाशी निगडित दु:खद घटना समोर आली आहे. निलगार गणपतीची परंपरा जपणारे आणि गणपतीचे प्रमुख सेवेकरी असलेले अशोक हेद्दूरशट्टी यांचे आज निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संकेश्वर निलगार गणपती भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. भाविकांच्या भावनांचा विचार करून आज व उद्या (दि. ३१ ऑगस्ट व …

Read More »

सार्वजनिक श्री गणेश मंडळ गर्बेनहट्टी यांच्या खुल्या कबड्डी ट्राॅफीवर म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांची मोहर!

  खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे सांस्कृतिक, कला, क्रीडा स्पर्धामध्ये नेहमी अग्रेसर असणारं विद्यालय असून तालुक्यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतात. शिक्षणात बरोबर क्रीडा क्षेत्रातही खेडोपाड्यातील विद्यार्थिनींनी आपला नावलौकिक वाढवून सरकारी सेवेतील आरक्षणाचा फायदा घ्यावा या हेतूने कार्यरत असणाऱ्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री …

Read More »

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतले जिजाऊ गणेश मंडळाच्या बाप्पाचे दर्शन….

खानापूर : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आपल्या पत्नीसोबत खानापूर येथे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्थापन केलेल्या जिजाऊ गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. अंजली निंबाळकर यांचे बंधू …

Read More »

अभिनेता दर्शनच्या पत्नी-मुलाविरुद्ध अश्लील पोस्ट; महिला आयोगाची कारवाईची मागणी

  बंगळूर : चॅलेंजिंग स्टार आणि अभिनेता दर्शनची पत्नी विजयालक्ष्मी आणि मुलगा विनेश यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महिला आयोगाने पोलिसांना पत्र लिहिले आहे. महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना आयोगाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नेलमंगला येथील भास्कर प्रसाद यांनी महिला आयोगाकडे …

Read More »

धर्मस्थळ प्रकरण: खोटे बोलण्यासाठी सूत्रधाराने दिली सूपारी

  चिन्नय्याच्या जबाबाने खळबळ; तिमारोडी पुन्हा अडचणीत? बंगळूर : धर्मस्थळ प्रकरणाला रोज एक वेगळे वळण मिळत आहे. एकीकडे, सुजाता भटची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे एसआयटीच्या ताब्यात असलेल्या जागल्या (चिन्नय्या) ने आपणास खोटे बोलण्यासाठी पैसे देण्यात आल्याची माहिती दिल्याचे समजते. दरम्यान, जागल्याने आनलेली कवटी महेश शेट्टी तिमारोडी यांच्या बागेतून आणल्याची माहिती …

Read More »