Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

निपाणी येथील शर्यतीत शिवानंद भोसलेंची घोडागाडी प्रथम महाशिवरात्रीनिमित्त आयोजन 

निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता.२३) सायंकाळी आयोजित जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीच्या शिवानंद भोसले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीमध्ये यांच्या यमगरणीच्या रामचंद्र मोरे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस पटकाविले. तर …

Read More »

ट्रक- कारच्या भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

  हुबळी : पादचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कारने समोर जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात बालकासह 5 जण जागीच ठार आणि चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास धारवाडनजीक पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातातील मृतांची नावे नागप्‍पा इराप्पा …

Read More »

हंचिनाळ येथे रयत संघटनेच्या शाखेचे उदघाटन

  कोगनोळी : हंचिनाळ (तालुका निपाणी) येथे रयत  संघटनेच्या ४३ व्या शाखेचे उदघाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते झाले. हंचिनाळ शाखाध्यक्ष मोहन नलवडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोलताना राजू पोवार म्हणाले, आम्ही गेली २० वर्षे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे याद्वारे अहोरात्र झटत आहोत. मात्र देशातील व राज्यातील सत्ताधारी …

Read More »

खानापूर मलप्रभा नदी घाटावर स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर आमवश्या, मंगळवार, शुक्रवार तसेच शिवरात्र आदी दिवशी भाविकांची स्नानासाठी, पुजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी भाविक नदी घाटावर पुजा करतात. पुजेवेळी नारळ फोडले जातात. पुष्पहार, केळी, तसेच प्लॅस्टिक पिशव्या मलप्रभा नदीच्या प्रवाहात सोडुन देतात. …

Read More »

खानापूर हेस्काॅम खात्याकडून नविन विद्युत खांब उभारून केली ग्राहकांची समस्या दूर!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हेस्काॅम खात्याकडून नुकताच ग्राहक मेळावा पार पडला. यावेळी अनेक ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बेळगांव जिल्हा हेस्काॅम खात्याचे कार्यकारी अभियंते प्रवीण कुमार चिकोडे, खानापूर हेस्काॅम खात्याच्या अभियंत्या कल्पना तिरवीर तसेच सहाय्यक अभियंता श्री. रंगनाथ आदी उपस्थित होते. यावेळी ग्राहक मेळाव्यात खानापूर येथील शेतकरी जयराम …

Read More »

कणकुंबी माऊली मंदिर आवारात स्वच्छता मोहीम

  खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील जागृत देवस्थान माऊली देवीची यात्रा १२ वर्षानी गेल्या ८ ते १५ फेब्रुवारी पर्यंत मोठ्या उत्साहात पार पाडली. यात्रेला लाखोभाविकानी दर्शन घेतले. या काळात मंदिराच्या आवारात चारी बाजूंनी केरकचरा, प्लास्टिक बाॅटल, प्लास्टिक पिशव्या, इतर साहित्य जिकडे तिकडे विखुरलेले होते. या परिसरात पाळीव जनावरे …

Read More »

खानापूर तालुका मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

  खानापूर : वेगवेगळ्या क्षेत्रात समाजासाठी योगदान देणाऱ्या साधकांचा सत्कार करणे हे विधायक कार्य आहे. असे सत्कार कर्तृत्ववान व्यक्तींना समाजासाठी आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे खानापूर तालुका मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने कुस्तीगीर संघटना आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येत असल्याचे चेअरमन आबासाहेब दळवी यांनी सांगितले. येथील खानापूर तालुका …

Read More »

महादेवाच्या पालखीची मिरवणूकीने समाधी मठाला भेट महाप्रसादाचे वाटप

निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचा रथोत्सव मंगळवारी (ता.२१) पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.२२) सकाळी येथील महादेव मंदिरापासून उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाधी मठात उत्सव मूर्तीची पूजा करून महाप्रसादाचे वाटप झाले. प्रारंभी महादेव मंदिराजवळ महोत्सव कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस पुष्पहार …

Read More »

‘हर, हर महादेवा’च्या गजरात निपाणीत रथोत्सव

हजारो भाविकांची उपस्थिती : रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता निपाणी (वार्ता) : करडी ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांचा आकाशाला गवसणी घालणारा आवाज आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.२१) झाला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रस्ते फुलले होते. दुपारी ३वाजता रथात बसण्यासाठी सवाल …

Read More »

आयएएस अधिकारी सिंधूरी व आयपीएस अधिकारी रूपाची अखेर बदली

  वाद चव्हाट्यावर आणल्याचा परिणाम; अद्याप नवीन पोस्टींग नाही बंगळूर : सार्वजनिक भांडणाचा स्पष्ट परिणाम म्हणून, आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि आयपीएस अधिकारी डी. रूपा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतेच नवीन पोस्टींग देण्यात आलेले नाही. वरिष्ठ आयएएस अधिकारी मुनीश मौदगील, जे रूपाचे पती आहेत, त्यांचीही …

Read More »