Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर हेस्काॅम खात्याकडून नविन विद्युत खांब उभारून केली ग्राहकांची समस्या दूर!

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हेस्काॅम खात्याकडून नुकताच ग्राहक मेळावा पार पडला. यावेळी अनेक ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बेळगांव जिल्हा हेस्काॅम खात्याचे कार्यकारी अभियंते प्रवीण कुमार चिकोडे, खानापूर हेस्काॅम खात्याच्या अभियंत्या कल्पना तिरवीर तसेच सहाय्यक अभियंता श्री. रंगनाथ आदी उपस्थित होते.
यावेळी ग्राहक मेळाव्यात खानापूर येथील शेतकरी जयराम पाटील यांनी आपल्या शेतात गेल्या वर्षाभरापासुन विद्युत खांब पडला आहे. तो उभारून द्या, अशी मागणी ग्राहक मेळाव्यात केली होती. याची दखल जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण कुमार चिकोडे व तालुका कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर, आदींनी जयराम पाटील यांच्या तक्रारीची लागलीच दखल घेऊन दोन दिवसात विद्युत खांब उभारून देतो, असे आश्वासन दिले. लागलीच जयराम पाटील यांच्या शेतात नविन विद्युत खांब उभारून समस्या दूर केली.
त्यामुळे जयराम पाटील यांनी खानापूर तालुका हेस्काॅम खात्याचे आभार मानले. त्यांची समस्या मार्गी लागली. त्यामुळे समाधान पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *