Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

निपाणीकरांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील!

  आमदार शशिकला जोल्ले : ‘आमचा दवाखान्याचे’ उद्घाटन निपाणी (वार्ता) : मागासवर्गीय भागात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘आमचा दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच त्याचा उपयोग होणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वी अर्बन हेल्थ सेंटर सुरू करून आरोग्य सुविधा दिल्या आहेत. …

Read More »

पावसामुळे लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे लोंढ्यातील वीज प्रवाह खंडित झालेला आहे. त्याशिवाय लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे लोंढा गावातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. …

Read More »

पावसाळ्यात राहा सर्पांपासून सावधान!

  निपाणी तालुक्यात विषारी चार जाती : मारण्याऐवजी सर्पमित्रांना द्या माहिती निपाणी (वार्ता) : पावसाळी दिवसात बिळात पाणी भरत असल्याने सर्प बाहेर पडतात. अशावेळी सर्प विषारी असो की बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात. यामुळे या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगत विषारी आणि बिनविषारी सर्पांची माहिती घेण्याची गरज निपाणी परिसरातील सर्पमित्रांनी …

Read More »

खासगी बस पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

  25 प्रवासी जखमी यल्लापूर : उत्तरा कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला. खासगी बस पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. बेंगळुरूहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील …

Read More »

गर्लगुंजी प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या निवडणुकीत श्री माऊलीदेवी शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील तालुक्यातील सर्वात जुनी पीकेएस सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीची खानापूर तालुक्यात चुरशीची निवडणूक म्हणून सर्वाचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले होते. यामध्ये जुने संचालक असलेले पॅनल श्री माऊली देवी शेतकरी विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल …

Read More »

टिप्पर – कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

  हासन : हासन जिल्ह्यातील आलूर तालुक्यातील ईश्वरहळ्ळी कुडीगेजवळ टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कुप्पळ्ळी गावचा चेतन, गुड्डेनहळ्ळी गावचा अशोक, थत्तेकेरी गावचा पुरुषोत्तम आणि आलुर तालुक्यातील चिगळूर गावचा दिनेश यांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

खानापूर तालुक्‍यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी

  खानापूर : खानापूर तालुक्‍यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी (दि. 22 जुलै) खानापूर तालुक्‍यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. खानापुर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली …

Read More »

दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. क्रे. सोसायटी चेअरमनपदी विलासराव बेळगावकर, व्हा. चेअरमनपदी पुंडलिक नाकाडी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील तालुक्यात सर्वात प्रथम सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकताच बिनविरोधात पार पडली. यावेळी संचालक पदी शंकर कुडतुरकर (जांबोटी), यशवंत पाटील (ओलमणी), विद्यानंद बनोशी (खानापूर), पुंडलिक गुरव (गोल्याळी), पांडुरंग नाईक (आमटे), पुंडलिक नाकाडी (बैलूर), विलास कृष्णाजी बेळगावकर …

Read More »

खानापूर शहरासह तालुक्यात धुवांधार पाऊस, रस्त्याची दयनिय अवस्था

  खानापूर : गेल्या चार दिवसापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे. तालुक्यातील पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर शहरालगत रूमेवाडी क्राॅस जवळ रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी आले त्यामुळे रस्ता वाहुन गेला आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे …

Read More »

ममदापूर ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

  अध्यक्षपदी विद्या शिंदे, उपाध्यक्षपदी गजानन कावडकर निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अमित शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी मतदान पद्धतीने झालेल्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मारुती कावडकर व भाजप गटाचे बाळासाहेब कदम असे दोन अर्ज दाखल झाले. …

Read More »