खानापूर : कुप्पटगिरी- खानापूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या दगडी पूलाची ग्रामस्थांनी श्रमदानातून आज डागडूजी केली. सदर पूलाला भगदाड पडले होते व वाहतुक करणे धोक्याचे ठरत होते. कुप्पटगिरी रस्त्यावरील हा पूल उंचीला कमी असल्याने दर वर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत जाते व त्याकाळात पूलावरून रहदारी बंद होते. तशात हा पूल …
Read More »भारतीय नागरिकांनी दक्ष राहावे : प्रा. डॉ. अच्युत माने
दिग्विजय युथ क्लबतर्फे क्रांती दिन निपाणी (वार्ता) : शेजारील देशांमध्ये अराजकता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचे मोल करणे आवश्यक आहे. जात,पात पंत, भाषा, धर्मभेदाला बाजूला ठेवून प्रत्येक भारतीय नागरिकांनी कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे. क्रांतिकारकांनी आपल्या लढ्याद्वारे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मत …
Read More »आधुनिक भारतासाठी तरुण सशक्त आवश्यक
पोलीस उपनिरीक्षिका उमादेवी; प्रहार क्लबतर्फे व्याख्यान निपाणी (वार्ता) : तरुण वर्गामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण व्याधीग्रस्त बनत आहे. त्यामुळे आधुनिक भारत निर्माण करायचा असेल तर तरुण वर्ग सशक्त व बलवान असणे आवश्यक आहे. त्याशिवाय भारत महासत्ता बनू शकत नाही, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका …
Read More »हुतात्मा स्मारक सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेतच
खुल्या भवनाची मागणी; उद्यान, सभागृहाचे स्वप्न अधुरे निपाणी (वार्ता) : इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी १९४२ साली क्रांती लढा झाला. त्यामध्ये निपाणी आणि परिसरातील क्रांतिकारकही सहभागी झाले होते. या लढ्यावेळी झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले तर शंकर पांगीरे हे तरुणपणी हुतात्मा झाले. त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी येथील जळगाव नाक्यावरील …
Read More »संकेश्वर नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी!
संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेसाठी नुकताच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सरकारने आरक्षण जाहीर केले असून नगराध्यक्षपद हे जनरल महिला तर उपनगराध्यक्ष मागासवर्गीय अ गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे यामुळे इच्छुकांचे लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूक तारखेकडे लागले असून तद्नंतर कोण बनेगा नगराध्यक्ष याची खमंग चर्चा नागरिकात रंगली आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता असून …
Read More »डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड येथे पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि …
Read More »ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आराखडा तयार करा : खानापूर तालुका समितीची हेस्कॉमकडे मागणी
खानापूर : ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी व्यापक उपाययोजना कराव्यात तसेच हलशी येथील सब स्टेशन लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हेस्कॉमकडे करण्यात आली आहे. खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यानी गुरुवारी खानापूरचे नूतन सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष …
Read More »मल्लिकार्जुन मंदिरामध्ये श्रावण मास निमित्त ज्ञानदासोह अंतर्गत अध्यात्मिक प्रवचन
कागवाड : मंगसुळी येथील श्रीमल्लिकार्जुन मंदिर येथे श्रावण मास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानदासोह अंतर्गत प्रवचन सह अन्नदासोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसून या कार्यक्रमासाठी प.पू.108 श्रीगुरुशिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान सिद्धेश्वर मंदिर बेळंकी, प पू. डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान म्हैसाळ यांचे दिव्य सानिध्यात …
Read More »महाराष्ट्र राज्य पात्रता परिक्षेत सीमाभागातील युवकांची उल्लेखनीय घौडदौड
निपाणी (वार्ता) : ज्ञानाच्या आड कोणतीही सीमा येऊ शकत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणून सेट परिक्षेच्या निकालाकडे पाहता येईल. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणीचे कार्याध्यक्ष अमर पाटील हे इंग्लिश विषयामध्ये, रमेश कुंभार राज्यशास्ञ विषयातून तर कार्यकारिणी सदस्य सनमकुमार माने हे लायब्ररी सायन्स या विषयांमधून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. …
Read More »पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी
रयत संघटनेची मागणी; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या पावसासह पुरामुळे बेळगावसह निपाणी, चिकोडी परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे. पाऊस कमी झाला असून पूर ओसरत आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यानंतर नुकसानीचा नि:पक्षपातीपणे सर्वे करून संबंधितांना भरपाई द्यावी, अशी …
Read More »