Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी

  राजू पोवार : रयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : डोणेवाडी येथील अनुष्का भेंडे प्रकरण, निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन, मका, भूईमुग, भात, ऊस व इतर कडधान्ये पिके यांचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब सर्वे करून शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रयत संघटनेतर्फे …

Read More »

अखेर खानापूर-रामनगर महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात

खानापूर : खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन तसेच खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधून दिला. त्यांना रस्त्याच्या दयनीय …

Read More »

कुप्पटगिरी नाल्यावरील पूल खचल्याने वाहतुक ठप्प

  खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावाच्या नाल्यावरील पूल गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याने कुप्पटगिरी गावाला या नाल्यावरून ये-जा होणारी वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे कुप्पटगिरी गावाच्या नागरिकांना खानापूर शहराला जाणारा जवळचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कुप्पटगिरी नागरिकांना अनेक समस्या तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेऊन …

Read More »

चिक्कोडीत पुन्हा बिबट्याची दहशत

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. बिबट्याने म्हशीच्या वासरावर हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली. मंगळवारी रात्री उशिरा बिबट्याने इंगळी गावातील शेतकरी कृष्णा जाधव यांच्या 2 वर्षाच्या म्हशीच्या वासरावर हल्ला केला. वासराच्या पोटाचा काही भाग फाडला. त्यामुळे वासराचा …

Read More »

उच्च न्यायालयाने ‘अजान’ विरोधातील याचिका फेटाळली; इतर धर्माच्या अधिकारांचे उल्लंघन नाही

  बंगळूर : राज्य उच्च न्यायालयाने सोमवारी राज्यातील मशिदींना लाऊडस्पीकरद्वारे “अजानची सामग्री” वापरण्यापासून रोखण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. सार्वजनिक जनहित याचिका (पीआयएल) मध्ये म्हटले आहे की, दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकरद्वारे अजान (इस्लाममध्ये प्रार्थना करण्याचे आवाहन) संपूर्ण वर्षभर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत इतर धर्माच्या श्रद्धावानांच्या …

Read More »

खानापूर- अनमोड (व्हाया शिरोली हेमाडगा) रस्ता त्वरीत दुरुस्त करावा; अन्यथा रस्त्यावर उतरू

खानापूर : खानापूर- अनमोड (व्हाया शिरोली हेमाडगा) रस्ता त्वरीत दुरुस्त करावा यासंदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खानापूर यांची भेट घेऊन मणतुर्गा ग्राम पंचायतीच्यावतीने आज निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून बेळगांव ते गोवा (व्हाया रामनगर) हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दुपदरीकरण नव्यानी करण्यासाठी सुरूवात केलेली होती. परंतु …

Read More »

संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्याला वाली कोण?

  शेवंता कब्बूरींचा सवाल संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील कारेकाजी पेट्रोल पंप जवळील संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावर गटारीचे सांडपाणी वाहत असल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत असल्याची तक्रार नगरसेविका शेवंता कब्बूरी यांनी केली आहे.आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेवंता कब्बूरी म्हणाल्या संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्याला कोणीच वाली दिसेनासा झाला आहे. सदर रस्त्याला जबाबदार कोण? संकेश्वर पालिका की …

Read More »

खानापूर समर्थ इंग्रजी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्राथमिक विभागातील अनिकेत सावंत, अथर्व चौगुले यांनी कुस्ती, दोरी उड्या, बॅटमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर हायस्कूल विभागातुन दत्तराज पाटील, श्रेया चौगुले, मलप्रभा नांदुरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे त्याची जिल्हा स्पर्धेसाठी …

Read More »

दक्षिण भागातील वस्ती बस सेवेअभावी नागरिकांचे बेहाल; बहुतांश गावांच्या वस्ती फेर्‍या रद्द

  खानापूर : खानापूर तालुका दुर्गम असल्याने या भागातील गावांच्या लोकांना खानापूर किंवा बेळगावला जायचे असेल तर अनेक गावातून पहाटे निघणार्‍या वस्ती बसफेर्‍या होत्या. पण अलीकडे निम्याहून अधिक गावांच्या वस्ती फेर्‍या बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कणकुंबी, गोदगेरी, कापोली, भुरूनकी, मेराड्यासह पूर्व भागांतील हंदूर व बोगूर या गावात पूर्वी …

Read More »

पश्चिम घाटाचे रक्षण करणे काळाजी गरज: समीर मजली

  खानापूर (विनायक कुंभार) : देशातील 60 टक्के हवामान पश्चिम घाटावर अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील जीवसृष्टी जोपासली पाहिजे, असे आवाहन बेळगावातील ग्रीन सॅव्हीयर्सचे समन्वयक समीर मजली यांनी केले. खानापूरमधील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत पर्यावरण जागृती या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज …

Read More »