Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

मूल्यमापन झाले, आता निकालाची प्रतीक्षा!

पाठ्यपुस्तके जमा करण्याची लगबग : अनेक पालक-विद्यार्थी सहलीवर निपाणी (वार्ता) : सलग तीन वर्षे कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊन ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. यंदाही कोरोनाची परिस्थिती वाढेल असा अंदाज असतानाच संसर्ग कमी झाल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर पहिली ते नववी निकाल जाहीर करण्यात आला.त्यानंतर …

Read More »

अकोळ शर्यतीत बाहुबली पाटील यांची बैलगाडी प्रथम

विविध गटात शर्यती : भैरवनाथ यात्रेची सांगता निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित विनालाठी-काठी बैलगाडी शर्यतीत अकोळच्या बाहुबली पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे 10 हजार 2 रुपये बक्षीस मिळविले. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या यात्रेची सांगता करण्यात आली. जनरल बैलगाडी शर्यतीत साताप्पा आरडे-वाघापूर, आर. एन. गुडसे यांच्या बैलगाड्यांनी …

Read More »

सकल मराठा समाजाच्या “गुरुवंदना” कार्यक्रमाची निपाणी परिसरात जनजागृती

बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 15 मे रोजी भव्य “गुरुवंदना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बेळगावातील मराठा समाजातील प्रमुखांनी जनजागृती सुरू केली आहे. निपाणी, संकेश्वर, कोगनोळी, उगार, अथणी आदी भागातील मराठा समाजातील प्रमुखांनी किरण जाधव यांच्याशी संपर्क करून कार्यक्रमाच्या जनजागृतीबाबत चर्चा केली आणि माहिती …

Read More »

अंगणवाडीना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा

महेश जाधव यांचा आरोप कोगनोळी : अंगणवाडीमध्ये पुरवलेल्या धान्यामध्ये काही ठिकाणी उत्तम दर्जाचे तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत आहे. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव यांनी केली आहे. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोगनोळी हणबरवाडी, दत्तवाडी, कुंबळकट्टी इत्यादीसह परिसरात बारा अंगणवाडीचा समावेश आहे. या बारा …

Read More »

संकेश्वर प्रभाग १३ ची पोटनिवडणूक जाहीर

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेली नगरसेवकपदाची जागा भरुन काढण्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २ मे २०२२ पासून निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होत आहे. २ ते ९ मे २०२२ अखेर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० मे २०२२ रोजी …

Read More »

खानापूरात शिवजयंती, बसवजयंती, रमजाननिमित्त शांतता बैठक संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावात होणाऱ्या दि. २ मे व दि. ३ रोजी शिव जयंती, बसव जयंती त्याचबरोबर रमजान ईद तसेच चर्च यात्रा आदी उत्सव शांततेत, उत्साहात पार पाडण्यासाठी येथील तालुका पंचायत सभागृहात शांतता कमिटीची बैठक गुरूवारी दि. २८ रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रविण जैन …

Read More »

शिव-बसव जयंती, ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती, जगदज्योती श्री बसवेश्वर जयंती आणि मुस्लिमांचं पवित्र रमजान ईद शांततेने सौहार्दपूर्वक निश्चितच पार पाडली जाईल, असे संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित शांतता कमिटीच्या सभेला उद्देशून बोलत होते. सभेच्या …

Read More »

चंदन चोरांना फाशी देण्यात यावी : कृष्णा शितोळे

निपाणी : चंदन शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळते. एका लिटर तेलाचा दर तीन ते चार लाख रुपये आहे त्यामुळे चंदनाची चोरी केली जाते म्हणून चंदन चोरांना फाशी देण्यात यावी, असे मत निपाणी हुडको कॉलनीमधील कृष्णा शितोळे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात चंदन शेती सेमिनार …

Read More »

भिवशी येथे अंगणवाडी खोल्यांचा भूमीपूजन शुभारंभ

सौंदलगा : भिवशी येथे दोन अंगणवाडी खोल्यांचा भूमीपूजन शुभारंभ आशा ज्योती विशेष मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर. बी. मगदुम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा पंचायती फंडातून या अंगणवाडी मंजूर झाल्या असून यातील …

Read More »

घोटगाळी ग्रामपंचायतीवर जनतेचा घेराव

खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या कामकाजात सुव्यवस्थितपणा नाही. कामकाजात गैरप्रकार होत असल्याचा दावा करत घोटगाळी परिसरातील नागरिकांनी पंचायतीला जाब विचारण्यासाठी नुकताच घेराव घातला. यावेळी सदस्यांकडून झालेला गैरकारभारासंदर्भात विचारणा करताच ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी, सदस्य लोकांना समर्पक उत्तरे देण्यास अयशस्वी ठरले आणि लागलीच तेथून काढता पाय घेतला. …

Read More »