खानापूर : पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता सर्वांमध्येच असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवा वर्ग धडपड करीत असतो. मात्र शिक्षण खात्याने मतदार साक्षरता संघामार्फत शालेय मंत्रिमंडळ निवड प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते याचे धडे मिळत असून मंगळवारी हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल येथे …
Read More »उत्तर कार्याला फाटा देऊन खराडे कुटुंबीयांकडून रोपांचे वाटप
निपाणी (वार्ता) : येथील शिक्षण सेवा मंडळ संचलित विद्यामंदिर शाळेचे गणित शिक्षक आप्पासाहेब खराडे यांचे नुकतेच निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी उत्तर कार्याच्या कार्यक्रमाला फाटा देऊन रोपांचे वाटप करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमित खराडे आणि कुटुंबीयांनी तिसऱ्या दिवशी नातेवाईकांना १२५ रोपांचे वाटप करून पर्यावरण पूरक उत्तरकार्य पूर्ण केले. आप्पासाहेब …
Read More »दुधाचे दर वाढवलेले नाहीत; मुख्यमंत्री सिद्धरामय्या
अतिरिक्त दूधासाठी अतिरिक्त किंमत बंगळूर : दुधाचे उत्पादन वाढल्याने नंदिनी दुधाचे प्रति पॅकेट ५० मि.ली. दुधाचे प्रमाण वाढले आहे. यावर स्पष्टीकरण देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जादा दुधासाठी दोन रुपये दर ठरवून तो ग्राहकांकडून वसूल केला आहे, मात्र दुधाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे. …
Read More »नंदिनी दूधाच्या दरात दोन रुपयाने वाढ
प्रति लिटर ५० मिली अतिरिक्त दूध मिळणार बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महामंडळाने दुध दरात बदल केला असून दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्या (ता. २६) पासून ही दरवाढ लागू होणार आहे. नंदिनी दुधाच्या …
Read More »बालविवाहाच्या आरोपावरून पतीला अटक
खानापूर : अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याच्या आरोपावरून बालविकास योजना अधिकाऱ्यांनी तिच्या पतीला अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले असल्याची घटना मंगळवारी खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी गावातील २४ वर्षीय तरुण हा मंजुनाथ डुगनावर याने …
Read More »कर्नाटकाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील कन्नड शाळांना भेट देणार
बेंगळुरू : कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे शिष्टमंडळ सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यांतील कन्नड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती तालुक्यांतील आमदारांना भेटणार आहे. महाराष्ट्र सरकारने ११ कन्नड शाळांमध्ये १५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या विद्यार्थ्यांची …
Read More »चिकन, फिश कबाबसाठी कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी
नियमाचे उल्लंघन केल्यास जन्मठेपेची शिक्षा बंगळूर : गोबी मंचुरीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातल्यानंतर आता राज्य सरकारने कबाबमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी अधिकाऱ्यांना अन्न सुरक्षेबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माशांसह चिकन, कबाब खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग टाकण्यास बंदी घालणारा आदेश …
Read More »बोरगावमधील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे निधन
निपाणी (वार्ता) : बोरगाव परिसराचे भाग्यविधाते, अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारत्न रावसाहेब पाटील(वय ८१) यांचे मंगळवारी (ता.२५) निधन झाले. त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असतांना …
Read More »तत्परसेवा, पारदर्शकता हेच रवळनाथचे सूत्र
अध्यक्ष एम. एल. चौगुलेः ‘रवळनाथ’तर्फे गुणवंताचा सत्कार निपाणी (वार्ता) : नोकरदारांच्या गरजेतून रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीची स्थापना झाली. सुरुवातीपासूनच सामाजिक बांधिलकीचे व्रत आणि सहज-सुलभ अर्थसहाय्याचे धोरण, विनम्र व तत्पर डिजिटल सेवा आणि पारदर्शक कारभार हेच सूत्र जपल्यामुळेच अल्पावधितच संस्था देशपातळीवर पोहचली आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. …
Read More »निपाणीतील शर्यतीत सदाशिव घाटगे यांची घोडागाडी प्रथम
निपाणी (वार्ता) : बेंदूर सणानिमित्य उत्तम पाटील युवा शक्ती संघातर्फे येथील हालसिद्धनाथ मंदिरजवळ आयोजित जनरल घोडा गाडी शर्यतीमध्ये निपाणी येथील सदाशिव घाटगे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजाराचे बक्षीस मिळवले. शर्यतीत निपाणीच्या जे. ए. पाटील आणि विकास कांबळे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची ३ हजार, २ …
Read More »