Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१० कोटी मंजूर : मुख्यमंत्री बोम्माई

घरांच्या नुकसानीची भरपाई जाहीर बंगळूर (वार्ता) : अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील १३ जिल्हे प्रभावित झाले असून तेथील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ५१० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रविवारी बंगळुरमध्ये बोलताना दिली.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे सुरू …

Read More »

पाण्यातून वाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या श्री. कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान

बेळगाव : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री. कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 …

Read More »

निरंतर ज्योतिचा शुभारंभ लाभ बोगूर शेतकऱ्यांनी घ्यावा

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात निरंतर ज्योती योजना कार्यान्वित होऊन शेतकरी वर्गाला चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात २१८ खेड्यापैकी १६५ खेड्याना या निरंतर ज्योती योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत खेड्यानाही निरंतर ज्योती योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील इटगी विभागातील बोगूर येथे निरंतर ज्योती योजनेंतर्गत शिवारतील ७० घराना निरंतर ज्योती …

Read More »

कर्नाटक एन्ट्रीसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह आवश्यक

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कर्नाटक सरकारने शनिवारी दुपारी पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश देताना आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राज्यात कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश काढला आहे. त्यांची कडक अंमलबजावणी शनिवारी दुपारपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर सीमातपासणी …

Read More »

बेळगाव, खानापूर तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित

बेळगाव (वार्ता) : हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचा काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, वाघवडे, रंगधोळी, मार्कंडेयनगर, …

Read More »

भाजप महिला मोर्चा कार्यकारिणीची सभा खेळीमेळीत

खानापूर (वार्ता) : भाजप महिला मोर्चा बेळगाव ग्रामांतर जिल्हा आणि खानापूर महिला मोर्चा कार्यकारिणीची सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. खानापूर येथील रवळनाथ मंदिरामध्ये काल शुक्रवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खानापूर भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रेमा भंडारी, खानापूर महिला मोर्चा अध्यक्ष …

Read More »

खानापूरात श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्या शांतिनिकेतनला डिग्री काॅलेजची मंजुरी

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रूप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या शांतिनिकेतन डिग्री काॅलजला राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.यंदापासुन विज्ञान व वाणिज्य शाखेच्या डिग्रीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सरूवात झाली असुन तालुक्यातील विद्यार्थी वर्गाने गुणात्मक शिक्षणासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे …

Read More »

खानापूरच्या मिलीग्रीज चर्चला सीपीआय सिंगेची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मिलीग्रीज चर्चला पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे तसेच पोलिस उपनिरीक्षक सरनेश जलिहाल यांनी नुकताच भेट दिली.यावेळी भाजपचे तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस यानी मान्यवरांचा परिचय करून दिला.यावेळी फादर कुद्रास लिमा एस जे, पॅरिस प्रिस्ट, फादर ऍन्थोनी, सिस्टर परेसिला, सिस्टर दिव्या, सिस्टर सबिथा, सिस्टर फ्लोरा, सिस्टर …

Read More »

नागरगाळी पुलाची दुरावस्था बससेवा ठप्प

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक, रस्ते पुलाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. अशाच प्रकारे नागरगाळी मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झाले आहे.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे.खानापूर, नंदगड, नगरगाळी मार्गावरून जाणाऱ्या बस वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे या मार्गावरून नागरगाळी, अळणावर, हल्याळ, दांडेली आदू …

Read More »

खानापूर-रामनगर महामार्गाची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर-रामनगर महामार्गाची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दुरावस्था झाली आहे.त्यामुळे लोंढा-रामनगर भागातील नागरिकांना खानापूर, बेळगाव प्रवास करणे शक्यच नाही आहे.सध्या काही भागात पॅचवर्कचे काम करण्यात येत आहे. याची पाहणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात कामाची पाहणी केली.यावेळी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत …

Read More »