Sunday , September 20 2026
Breaking News

कोगनोळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मेस काट्यांची विक्री

Spread the love

कोगनोळी : हिंदूंच्या सणा पैकी प्रमुख मानल्या जाणार्‍या गुढीपाडव्याच्या सणाची लगबग सर्वत्र दिसून येत आहे.
कोगनोळी तालुका निपाणी येथे शनिवार तारीख 2 रोजी असणार्‍या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील अंबिका मंदिराजवळ मेसकाट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
चालू वर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व शासनाने सणसमारंभ वरील बंदी उठवल्याने सण समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत.
परिसरात गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासाठी लागणार्‍या मेस काट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
येथील अंबिका मंदिराजवळ हे मेसकाठी विक्रेते 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये अशी मेस काट्यांची विक्री करत आहेत.
याच बरोबर स्टेशनरी व किराणा दुकानात गुढीसाठी लागणार्‍या पुजेच्या साहित्याची खरेदी करताना ही नागरिक दिसत आहेत. गुढीसाठी लागणारे कलश, वस्त्र, साखरेची माळ आदी साहित्य दुकानात मांडण्यात आले आहे.
यावेळी बोलताना अनिल कोरवी म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत मेस काटीचे दर वाढले आहेत. सध्या मेसकाटी खरेदी करण्यासाठी गर्दी कमी असली तरी एक-दोन दिवसांमध्ये मेसकाठी खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतील असे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *